मुंबई, 17 जून : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. काही भागात चांगला पाऊस तर काह भागात अद्याप चांगला पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी, असेही आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
खान्देशातील पावसाचा अंदाज –
खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस पडला नसून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा लागली आहे. सुरूवातीला मान्सूनचा पाऊस चांगला झाल्याने काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणी केल्याचे दिसून येत आहे. यामुळे वेळेत पाऊस न आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये आज आणि उद्या काही प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका! –
ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेती कामांना वेग आल्याने शेतकरी खरिपाची पेरणी करत आहे. मात्र, ज्या भागात चांगला पाऊस झाला नाही, त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, जोपर्यंत 100 मिलीमीटर पावसाची नोंद होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, अशी माहिती देखील कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रशासन झाले सतर्क –
मागील तीन चार दिवसात राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे देखील पाहायला मिळालंय. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झाले असून प्रशासनाने सगळी तयारी देखील केली आहे. ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेतीच्या कामांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा-महाविद्यालयातच मिळणार आता एसटीचा पास, काय महामंडळाची विशेष मोहीम?