जळगाव, 10 एप्रिल 2024 : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना जळगाव जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावातील असोदा शिवारात तरूणाचा खून केल्याची घटना काल 9 एप्रिल रोजी सकाळी घडली. ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी (वय-35) असे मृत तरूणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात मृत तरूण राहत होता. ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी या तरुणाने शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात चोरी केल्याचा शेजाऱ्यांना संशय होता. यावरून चौघांनी दुचाकीवर बसवून ज्ञानेश्वर याला सोबत घेऊन गेले. दरम्यान, ज्ञानेश्वर याचा मृतदेह असोदा शिवारात पडलेला असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना मिळाली.
संशयित पोलिसांच्या ताब्यात –
घटनेची माहिती मिळताच ज्ञानेश्वरला चोरीच्या संशयावरून परिसरातील चौघांनी असोदा शिवारात घेऊन जात बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला. दरम्यान, शनिपेठ पोलीसचे अधिकारी यांच्यासह ठसे तज्ञ आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहचल्यानंतर पोलिसांनी तत्काळ 4 संशयितांना देखील ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान, ज्ञानेश्वरच्या निधनाने घटनास्थळी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.
हेही वाचा : Breaking News : पवारांचं ठरलं! रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसेंच्या विरोधात दिला ‘हा’ उमेदवार