मिलिंद वाणी, प्रतिनिधी
वडती (चोपडा), 14 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, चोपडा तालुक्यातील वडती येथील पुज्य साने गुरूजी माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या परिक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून निखिल सुनिल वाणी या विद्यार्थ्याने 95.40 टक्के मिळवत प्रथम क्रमांक पटकावलाय.
वडती महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के –
चोपडा तालुक्यातील वडती येथील पुज्य साने गुरूजी माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या परिक्षेचा निकाल 100 टक्के लागला.
पुज्य साने गुरूजी माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या निकालातील टॉप 5 विद्यार्थी –
- निखिल सुनिल वाणी – 95.40 %
- हर्षदा जीवन कोळी – 90.80 %
- हेमांगी समाधान पाटील – 90.80 %
- भावेश दशरथ माळी – 89.60 %
- साक्षी नवनीतलाल कोळी – 89.20 %
- रागीणी छोटू पाटील – 89 %
राज्याचा निकाल 94.10 टक्के –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर केलेल्या दहावीच्या निकालनुसार, राज्याचा निकाल हा 94.10 टक्के इतका लागला असून यामध्ये यंदाही मुलींनी बाजी मारलीय. तसेच यंदा कोकण विभाग अव्वल ठरलाय तर नागपुर विभागाचा निकाल सर्वाधिक कमी टक्केवारीचा आहे.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी –
- कोकण : 99.82 टक्के
- कोल्हापूर : 96.78 टक्के
- मुंबई : 95.84 टक्के
- पुणे : 94.81 टक्के
- नाशिक : 93.04 टक्के
- अमरावती : 92.95 टक्के
- संभाजीनगर : 92.82 टक्के
- लातूर : 92.77 टक्के
- नागपूर : 90.78 टक्के