• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 28, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

ईसा तडवी, प्रतिनिधी

शिंदाड (पाचोरा), 27 फेब्रुवारी: चोरीच्या खोट्या आरोपामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याने शिंदाड येथील वर्षीय तरूण अतुल लक्ष्मण अहिरे याने पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, या घटनेचा शिंदाड येथील ग्रामस्थांनी तीव्र निषेध नोंदवत सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे निवदेन पिंपळगाव हरे. पोलिसांना देण्यात आले आहे.

सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी –

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून गावबंदची हाक देण्यात आली होती. यावेळी गावातून रॅली काढत तरूण आत्महत्या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान, सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी संदर्भात पिंपळगाव हरे. पोलीस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना निवदेन देण्यात आले. पिंपळगाव हरे. पोलिस स्टेशनच्यावतीने विठ्ठलराव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले.

ही घटना केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नसून संपुर्ण समाजासाठी चिंतेचा विषय आहे. अशाप्रकारे खोटे आरोप करून एखाद्याला मानसिक छळ देणे ही अतिशय निंदनीय बाब आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच मृत तरूणाच्या कुटुंबाला शासकीय मदत व न्याय मिळावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले असून नरेंद्र विक्रम पाटील, समाधान सिताराम पाटील, पंकज पाटील, इंदल परदेशी, शांताराम बोरसे यांच्यासह इतर ग्रामस्थांच्या निवदेनावर सह्या आहेत.

नेमकं प्रकरण काय? –

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदाड येथील अतुल लक्ष्मण अहिरे (22) हा तरूण पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये काही महिन्यांपासून तेथे कामावर होता. हॉटेलमध्ये काम करत असताना त्याच्यावर चोरीचे आरोप करण्यात आले होते. दरम्यान, चोरीच्या खोट्या आरोपामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याने 23 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास पुणे येथील सासवड रोड रेल्वे स्टेशनजवळ अतुल याने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. याबाबतची तक्रार अतुलच्या भावाने दिली आहे.

हॉटेलमध्ये चोरी झाल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात येऊन गुन्हा कबूल करण्यास हॉटेल संचालकांनी अतुल यास सक्ती करून सह्या घेतल्या. संबंधित व्यवस्थापनाने त्याच्यावर दबाव टाकून मारहाण व शिवीगाळ केली असे या तक्रारीत सांगण्यात आले आहे. आपल्यावर चोरीचा खोटा आरोप करण्यात आल्याचा संदेश त्याने मोबाईवरून पाठवला होता.

हेही वाचा: VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora taluka latest newsshindad youth suicide casesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page