• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 27, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 27 फेब्रुवारी: पाचोरा नगरपरिषदेने नागरिकांच्या सोयीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा वापर करत व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटची निर्मिती केली आहे. या चॅटबॉटच्या माध्यमातून पाचोरा नगरपालिकेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांची माहिती तसेच तक्रार निवारण बाबतची माहिती नागरिकांपर्यंत व्हॉट्सअ‍ॅप पाठविण्यात येणार आहे. या अत्याधुनिक चॅटबॉटचे लोकार्पण नगराध्यक्षा सुनिताताई किशोरआप्पा पाटील व मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.

पाचोरा नगरपालिकेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, शिवसेना गटनेता सुमित किशोरआप्पा पाटील, भाजपा गटनेता सूरज वाघ, सभापती सतीश चेडे, सभापती प्रवीण ब्राह्मणे, सभापती रेहमान तडवी, सभापती प्रियांका पाटील, सभापती मीनाक्षी एरंडे तसेच सर्व नगरपरिषद नगरसेवक व नगरसेविका हे उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

‘असा’ आहे चॅटबॉट –

पाचोरा नगरपरिषदेने नागरिकांसाठी ऑटोमेशन आणि एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट्स उपलब्ध करुन दिला आहे. हा चॅटबॉट नागरिकांच्या प्रश्नांची तत्काळ उत्तरे देईल आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करेल. यामुळे नागरिकांना त्यांच्या समस्यांसाठी अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याची गरज लागणार नाही. नागरिकांना आवश्यक असलेली माहिती घरबसल्या उपलब्ध होऊ शकणार आहे. पहिल्यांदाच एका नगरपरिषदेत असा एआय चॅटबॉटचा वापर केला आहे. यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सोयी, सुविधा तसेच सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

राज्य शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, त्या योजनांचा सर्वसामान्यांना सुलभतेने लाभ मिळावा या उद्देशाने प्रत्येक विभागाने 150 दिवसात करावयाच्या कामांचा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

150 दिवसांच्या आराखड्यानुसार प्रभावी कार्यवाही करण्यासाठी विभागाचे संकेतस्थळ, नागरिकांचे सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयी व सुविधा, गुंतवणूक प्रसार, कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, ई ऑफिसचा वापर, नाविन्यपूर्ण उपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर (एआय) आदी मुद्दे ठरवून देण्यात आले होते.

यापैकी अनेक मुद्द्यांची तांत्रिक सांगड घालत प्रकल्प राबविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा नगरपरिषदेने घेतला. त्यानुसार, पाचोरा नगरपालिकेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी व नागरिकांच्या तक्रारी निवारण्यासाठी एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट तयार करण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील सर्व नागरिकांनी सदर एआय चॅटबोटचा वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्षा सुनीता किशोरआप्पा पाटील यांनी केले आहे.

‘अशी’ मिळवता येईल माहिती –

18002335259 या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप वर मेसेज करून आपल्याला माहिती मिळवता येईल व शहरातील समस्यांविषयी तक्रारी नोंदविता येईल.

हेही वाचा: VIDEO |उत्तर महाराष्ट्राच्या जलद कनेक्टिव्हिटीसाठी 105 किलोमीटर लांबीचा खान्देश एक्सप्रेसवेचा डीपीआर प्रक्रियेत – राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

बातमी शेअर करा !
Share
Tags: ai whatsapp chatbotpachora municipal councilpachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

July 16, 2026
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page