जळगाव – जळगाव जिल्ह्यातील जळगाव ते पाचोरा दरम्यान परधाडे जवळ काल झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून यातील 7 जणांची ओळख पटल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच या भीषण अपघातात एकूण 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर पाचोरा येथे उपचार आहेत. तर एका गंभीर जखमी प्रवाशाला जळगावला हलवण्यात आले आहे.
मृतांची नावे –
कमला भंडारी – वय-43, रा. कुलाबा, मुंबई (मूळ नेपाळ)
लच्छीराम खतरू पासी, वय-40, नेपाळ.
इम्तियाज अली, वय-35, रा. गुरुग्राम, उत्तरप्रदेश
नसिरुद्दीन बद्दुरद्दीन सिद्दाकी (असिम), वय-19, रा. गोंडा, उत्तरप्रदेश
हिमू नंदराम विश्वकर्मा, वय-11, नेपाळ
बाबू खान, वय-27, रा. कंदोसा, बहराईच, उत्तरप्रदेश
जवकला भाटे जयकादी, वय-60 रा. भिवंडी, ठाणे, (मूळ नेपाळ)
पाचोरा येथील विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची माहिती पुढीलप्रमाणे –
अबु मोहम्मद (वय-30, श्रावस्ती, उत्तरप्रदेश)
ह्युजला सावंत (वय-38, अचम, मेघालसेन, नेपाळ)
दीपक थापा, (वय-18, दहीलोक, नेपाळ)
धर्मा बहादूर सावंत (वय-8, मेघालसेन, नेपाळ)
पाचोरा येथील वृंदावन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची माहिती पुढीलप्रमाणे –
हकीम अन्सारी, (वय-45, श्रावस्ती, उत्तरप्रदेश)
हसन अली, (वय-19, बरहाईच, उत्तरप्रदेश)
विजयकुमार गौतम (वय-33, बरहाईच, उत्तरप्रदेश)
उत्तम हरजन (वय-25, बरहाईच, उत्तरप्रदेश)
मोहम्मद निब्बार, (वय-31, श्रावस्ती, उत्तरप्रदेश)
तर मंजू परिहार (वय-25, दहिलोक, नेपाळ) या गंभीर जखमी रुग्णाला जळगाव येथील गोदावरी रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
हेही वाचा – जळगाव रेल्वे अपघात; 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू, पाचोरा ते माहिजी स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं? A टू Z मुद्दे