जळगाव, 9 एप्रिल : हवामान विभागाने गेल्या दोन दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. दरम्यान, आज गुढीपाडव्याच्या दिवशीच राज्यातील जळगावसह अमरावती आणि वर्धा या 3 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे राज्यात एकीकडे उन्हाळा असताना दुसरीकडे अवकाळी पाऊस बरसत असल्याचे समोर आले आहे.
जळगाव जिल्ह्यात कुठे पडला पाऊस? –
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. ऐन काढणीला आलेल्या पीकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात इतरही काही भागात अवकाळी पाऊस पडला आहे. सध्यास्थितीत जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून पुढील काही तासात काही भागात पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.
उकड्यामुळे दिलासा-
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा तापला असल्याने नागरिक उकाड्यापासून दिलासा मिळण्याच्या प्रतिक्षेत होते. दरम्यान, राज्यात तयार झालेल्या अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे उष्णतेचा पारा कमी झाला असून नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा : लोकसभा निवडणूक 2024 विशेष : सत्तेला आव्हान देणारा माणूस, उन्मेश पाटील!