धुळे – जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशात चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये धुळे शहरासह जिल्ह्यात तब्बल 309 दुचाकींची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. धुळे जिल्ह्यातील 17 पोलीस ठाण्याच्या हद्दीत या चोरीच्या घटना वाढत असल्याचे दिसून आले आहे.
सामान्यत: दुचाकी कुठेही लावल्यानंतर हँडल लॉक केले जाते. मात्र, हे हँडल लॉक केल्यानंतरही दुचाकीची चोरी झाली आहे. जानेवारी 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत या चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरी झालेल्या 309 चोरीच्या दुचाकींपैकी फक्त 41 दुचाकी सापडल्या आहेत.
Mla Anup Agrawal: ‘वक्फ बोर्ड भारतासाठी धोकादायक’, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल Exclusive मुलाखत
दुचाकीच्या किंमती वाढल्या असल्याने अनेकांना दुचाकी घेणे परवडत नाही. मात्र, असे असतानाही काही जण आर्थिक बचत करुन लाखो रुपये किंमत असेलली दुचाकी खरेदी करतात. सध्याच्या परिस्थिती पाहिली असताना बाजारात इलेक्ट्रिक दुचाकीसुद्धा एक लाख रुपयांना तर पेट्रोलची दुचाकी ही एक लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांना मिळत आहे. त्यामुळे दुचाकीचोरीचा अनेकांना फटका बसत आहे.
चोरटे दुचाकीची चोरी केल्यानंतर ती तोडून तिची भंगारात विक्री करतात. भंगारात अशा दुचाकीच्या वाहनांच्या वस्तूंना चांगला भाव मिळतो. त्यामुळे चोरटे दुचाकीचे पार्टसची भंगारात विक्री करतात. यामुळे चोरलेल्या वाहनांचा शोध घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत, असे पोलिसांचे मत आहे.
jaykumar rawal : मंत्री जयकुमार रावल यांच्या सुवर्ण खान्देश लाईव्हला शुभेच्छा, Exclusive मुलाखत
धुळे जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढत आहेत. यामध्ये धुळे शहरात रेल्वे स्टेशन, बसस्थानक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जुने रुग्णालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल येथून सर्वाधिक दुचाकी चोरी झाल्या आहेत.
धुळ्याचे पोलीस अधीक्षक काय म्हणतात –
तर दुसरीकडे जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असताना दुचाकी डिटेक्शनचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे दुचाकी चोरीचे प्रमाण कमी होईल, असे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी म्हटले.
सर्वांना विनंती – कृपया आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावे.
यूट्यूब चॅनेलची लिंक – https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos