• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

जळगाव शहरात राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन; विविध राज्यांतील फिडे मानांकन प्राप्त 400 खेळाडूंचा असणार समावेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 29, 2025
in जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव शहरात राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन; विविध राज्यांतील फिडे मानांकन प्राप्त 400 खेळाडूंचा असणार समावेश

जळगाव, 29 जुलै : जळगाव येथे 38 व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 2 ते 8 ऑगस्ट 2025 दरम्यान जळगाव येथील जैन हिल्स परिसरातील आकाश ग्राऊंडमध्ये केले जाणार आहे. बाल चमूंचा हा बुद्धिबळ महासंग्राम जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मार्गदर्शनात होत असून जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड या आंतरराष्ट्रीय कंपनीने ही स्पर्धा प्रायोजित केली आहे.

जळगावात आयेजित या राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद मिळाला असून देशभरातून 500 पेक्षा अधिक खेळाडूंनी या अजिंक्यपद स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला आहे. विशेष उल्लेखनीय बाब अशी की, यातील फिडे मानांकन प्राप्त 400 खेळाडूंचा समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यातील निसर्गरम्य जैन हिल्स परिसरातील अनुभूती या भव्य दिव्य मंडपात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. ही बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेत एकूण 11 फेऱ्या होणार असून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने आखलेल्या नियमावलीनुसार ही स्पर्धा पार पडेल या स्पर्धेत कोलकता येथील आंतरराष्ट्रीय पंच देवाशीष बरुआ हे मुख्यपंचांची भूमिका निभवतील तर जळगावचे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे हे सहाय्यक पंच असून गुजरातचे प्रशांत रावल यांच्यासह अन्य 14 पंच हे या स्पर्धेचे संचलन करतील. ही बुद्धीबळ स्पर्धा मुली व मुले अशा स्वतंत्र वयोगटात आयोजित केली आहे.

या स्पर्धेत प्रत्येक डावा साठी बुद्धिबळ घड्याळांचा वापर अनिवार्य असून प्रत्येकी 90 मिनिटे व प्रत्येक चाली साठी 30 सेकंदाची वाढीव वेळ निर्धारित करण्यात आली आहे. बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी एकूण 8 लाखांची रोख पारितोषिके तसेच चषक दिले जाणार आहे. सदरील स्पर्धा जरी 11 वर्षा आतील वयोगटातील मानांकन स्पर्धा असली तरी स्पर्धेतील विजेते खेळाडू आशियाई व जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरतात. अशा स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग पाहता नवोदित खेळाडूंना देखील आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्याची संधी मिळते.


क्लासिकल प्रकारातील आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणे हे बहुतांशी बुद्धिबळ खेळाडूंचे स्वप्न असते, कमी वयातच जर हे मानांकन प्राप्त झाले तर खेळाडूंना भविष्यात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवणे तसेच बुद्धिबळातील स्पर्धात्मक वाटचाल सुकर होणे याबरोबरच बुद्धिबळ क्षेत्रात संधीची नवनवीन दालने पादाक्रांत करण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने प्राप्त होणार आहे. या स्पर्धेत  अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदिगड, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, पंजाब, राजस्थान, अशा विविध राज्यातील खेळाडूंशी आपला खेळ आजमावण्याची संधी यातून मिळेल तसेच या राष्ट्रीय स्पर्धेद्वारा आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्याची संधीसुद्धा या स्पर्धकांना मिळणार आहे.

या स्पर्धेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील 7, 9 व 11 वर्षातील वयोगटातील तसेच स्थानिक गुणवान खेळाडूंना मानांकन प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेची उल्लेखनीय बाब म्हणजे 550 नोंदणीकृत खेळाडूंमध्ये जवळपास 400 खेळाडूंना फिडे मानांकन प्राप्त आहे त्यात प्रथम मानांकित पुण्याचा अद्विक अग्रवाल(2251), मुलींमध्ये केरळची देवी बीजेस (1869) यांच्यासह अनेक खेळाडू हे आशियाई व जागतिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेले खेळाडू असून या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे पहिले प्रत्येकी सर्वोच्च सहा सामने डिजिटल बोर्डवर लाईव्ह खेळले जातील तसेच चेसबेस द्वारे स्पर्धेचे सामने आपणास त्यांच्या ॲपद्वारे लाईव्ह पाहण्यास मिळणार आहेत.

या स्पर्धेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व सहभागी खेळाडूंना त्यांच्या प्रत्येक डावातील निकालानुसार विजयी उपविजय व बरोबरीत असलेल्या खेळाडूंना विशेष मूल्यांकनानुसार रोख रकमेचे पारितोषिक जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड तर्फे दिले जाणार आहे प्रत्येक स्पर्धकांच्या उत्कृष्ट खेळासाठी प्रोत्साहेतू पुरस्कृत करणारी भारतातील ही एकमेव बुद्धिबळ स्पर्धा असेल असे मत या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन यांनी याप्रसंगी मांडले.

सदर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड चे चेअरमन अशोक जैन यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुख शेख, उपाध्यक्षा अंजली कुलकर्णी, जळगाव जिल्हा बुद्धिवान संघटनेचे सचिव नंदलाल गादीया, खजिनदार अरविंद देशपांडे, सहसचिव शकील देशपांडे व संजय पाटील सदस्य सर्वश्री चंद्रशेखर देशमुख, तेजस तायडे, पद्माकर करणकर, नरेंद्र पाटील, रवींद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे, रवींद्र दशपुत्रे, डॉ. तुषार उपाध्ये व सल्लागार सदस्य आर. के. पाटील, विवेक दाणी, यशवंत देसले तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टिम्स कंपनीचे सर्व सहकारी यांचे सहकार्य लाभत आहे.

हेही वाचा : Pune Update : पतीसाठी रोहिणी खडसे कोट घालून थेट न्यायालयात; सुनावणीनंतर काय म्हणाल्या?

बातमी शेअर करा !
Share
Tags: chess championshipjalgaon newsmarathi newsnational chess championship tournamentsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page