• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

78 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अखंड पोहोचवली सेवा; एसटीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 2, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
78 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अखंड पोहोचवली सेवा; एसटीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

मुंबई, 2 जून: महाराष्ट्राच्या जनमानसाशी अतूट नाळ जुळलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण एसटी परिवाराने ‘स्वच्छ एसटी, हरित एसटी आणि बचत करणारी सक्षम एसटी’ घडविण्याचा निर्धार करावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात मंत्री सरनाईक म्हणाले की, ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद अंगीकारून एसटीने गेली ७८ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अखंड सेवा पोहोचवली आहे. डोंगर-दऱ्या, दुर्गम आदिवासी भाग, ग्रामीण क्षेत्रे, शहर आणि महानगरांना जोडणारी लालपरी ही केवळ वाहतुकीचे साधन नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाची जीवनवाहिनी बनली आहे.

एसटीच्या या गौरवशाली प्रवासामागे लाखो अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक, निवृत्त सेवक आणि प्रवाशांचे योगदान असल्याचे नमूद करत त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. अनेक संकटांच्या काळातही एसटी कर्मचाऱ्यांनी निष्ठेने आणि समर्पणाने सेवा देत समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले असून अशा प्रत्येक कर्मचाऱ्याला आज सलाम करण्याची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत एसटी परिवाराने यावर्षी ‘७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प’ केल्याची माहिती देताना मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यातील प्रत्येक आगार, बसस्थानक आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहे. पर्यावरण रक्षण ही केवळ शासनाची नव्हे तर समाजाची सामूहिक जबाबदारी असून ‘एक वृक्ष – एक जीवन’ हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम एसटी करणार आहे.

यासोबतच “स्वच्छ एसटी – सुंदर एसटी” ही संकल्पना अधिक व्यापकपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सर्व बसस्थानके, बसस्थानक परिसर, एसटी बसेस तसेच चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची नियमित स्वच्छता आणि टापटीपपणा राखण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव देणे ही एसटीची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

महामंडळाच्या आर्थिक शिस्तीसाठी इंधन बचतीचे महत्त्व अधोरेखित करत मंत्री सरनाईक म्हणाले की, प्रत्येक आगाराने दररोज किमान पाच लिटर डिझेल बचत करण्याचा संकल्प केला आहे. छोट्या-छोट्या बचतीतून मोठी आर्थिक उभारणी शक्य होते. इंधन बचतीमुळे महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याबरोबरच प्रदूषण नियंत्रणालाही मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

एसटी ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे नमूद करत त्यांनी आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल सुविधा, आर्थिक शिस्त, हरित उपक्रम, स्वच्छता आणि प्रवासी-केंद्रित सेवा यांच्या माध्यमातून एसटीला नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज व्यक्त केली.

७८ व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण एसटी परिवाराने स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि उत्कृष्ट प्रवासी सेवा यांचा संकल्प करून महाराष्ट्राच्या विकासात अधिक प्रभावी योगदान द्यावे, असे आवाहन करत मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक, निवृत्त सेवक तसेच राज्यातील सर्व प्रवाशांना एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

‘चला, स्वच्छ एसटी, हरित एसटी आणि सक्षम एसटी घडविण्याचा निर्धार करूया,’ असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा: जळगाव विधानपरिषद निवडणूक: शेवटच्या दिवशी 16 अर्ज दाखल, महायुती-महाविकास आघाडीत बंडखोरी; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsMSRTCmsrtc 78th anniversaryst bussuvarna khandesh livetransport minister pratap sarnaik

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

78 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अखंड पोहोचवली सेवा; एसटीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

78 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अखंड पोहोचवली सेवा; एसटीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

June 2, 2026
जळगाव विधानपरिषद निवडणूक: शेवटच्या दिवशी 16 अर्ज दाखल, महायुती-महाविकास आघाडीत बंडखोरी; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

जळगाव विधानपरिषद निवडणूक: शेवटच्या दिवशी 16 अर्ज दाखल, महायुती-महाविकास आघाडीत बंडखोरी; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

June 1, 2026
जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

June 1, 2026
IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

June 1, 2026
सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page