ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 16 ऑगस्ट : पाचोरा तालुक्यातील पिंप्री (सार्वे) येथील माध्यमिक विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्षी ध्वजारोहणाचा मान गावातील प्रगतिशील शेतकरी सुकलाल हिलाल पाटील यांना देण्यात आला तसेच त्यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचं विधिवत पूजन करून ध्वजारोहण करण्यात आला.
यावेळी पिंप्री सार्वे गावचे सरपंच, सर्व सदस्य, पिंप्री हायस्कूलचे मुख्याध्यापक सागर पाटील, जि. प प्राथमिक शाळा मुख्याध्यापक, सोसायटी चेअरमन व सर्व सदस्य, ग्रामस्थ तसेच शाळेतील शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
View this post on Instagram
शाळेतील विद्यार्थ्यांनी आर.इ.पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पिरॅमिडचे प्रात्यक्षिक करून दाखवले. मुलांनी अतिशय शिस्तबद्ध सादरीकरण केले. त्यांचे गावातील लोकांनी तोंड भरून कौतुक केले. तसेच कवायत सादर करण्यात आली. इयत्ता 10 वी मध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकाने आलेल्या विद्यार्थ्यांसाठी बक्षिस वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
तसेच ITSE परीक्षेमध्ये आमच्या विद्यालयातील विद्यार्थी हर्षल सलकान पवार तालुक्यातून 10 क्रमांक मिळवला. त्याला ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच ITSE या परीक्षेत चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले . एकूण सर्व कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला.
हेही वाचा : पाचोरा तालुक्यातील होळच्या जि.प. शाळेचे उपशिक्षक साहेबराव चौधरी यांचा स्वातंत्र्यदिनानिमित सन्मान