वाशिम, 5 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आधी वाशिममधील पोहारादेवी येथे त्यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन तसेच भुमिपूजन पार पडले. यावेळी त्यांच्या जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत त्यांनी काँग्रेसह राज्यातील महाविकास आघाडीवर जोरादार टीका केली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पार्टीवर ज्या परिवाराने ताबा मिळवला. त्यांची विचारधारा ही आधीपासूनच विदेशी राहिली आहे, असा जोरदार हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? –
म्हणाले की, काँग्रेसला कायम वाटत राहिले आहे की, भारतावर कायम एका कुटुंबाचीच मक्तेदारी राहिली पाहिजे. कारण, हा हक्क त्यांना ब्रिटिशांनीच दिला होता. काँग्रेसची विचारधारा ही आधीपासूनच विदेशी होती आणि म्हणून त्यांनी बंजारा समाजाप्रती आपली अपमानजनक वागणूक कायम ठेवली, अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदी यांनी पोहारादेवी येथे आयोजित केलेल्या जाहीरसभेत बोलताना काँग्रेसवर केली.
महाविकास आघाडीवर जोरदार टीका –
नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर देखील जोरदार टीका केली. ते म्हणाले की, केंद्रात आमचे सरकार असताना देखील महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारमुळे अनेक योजना बंद झाल्या. त्याचं महाराष्ट्रातील जनतेला नुकसान झाले. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील डबल इंजिन सरकारमुळे राज्यातील शेतकऱ्यांना डबल फायदा झालाय. केंद्राकडून पीएम किसान सन्मान निधी दिला असताना राज्यातील महायुतीच्या सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजने अंतर्गत राज्यातील 90 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांच्या निधीचा वाटप करण्यात आला.
दरम्यान, पोहरादेवीच्या कृपाशीर्वादाने मला लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनाही निधी देण्याचे सौभाग्य मिळाले असून ही योजना नारी शक्तीचा सन्मान वाढवत असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी वाजवला ढोल –
पोहारदेवी येथील पूजेदरम्यान पंतप्रधान मोदींनी मंदिराच्या प्रांगणात उपस्थित ढोलही वाजवला. बंजारा समाजातील लोकांसाठी हे मंदिर खास असून पोहरादेवीच्या जगदंबा मातेवर त्यांची नितांत श्रद्धा असून देवीच्या विशेष पूजा आणि आरतीमध्ये ढोल वाजवणे हा एक अनिवार्य विधी आहे आणि जेव्हा मंदिरात लोकांच्या इच्छा पूर्ण होतात तेव्हा ते ढोल वाजवून त्यांचे अभिनंदन करत असतात.
View this post on Instagram
पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हप्त्याचं वितरण –
पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याचं आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याचं वितरण करण्यात आले. नवरात्रीच्या पवन पर्वावर मला पीएम किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता देता आला. देशातील साडेनऊ करोड शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार करोड निधी देण्यात आला आहे असून महाराष्ट्रातील डबल इंजिनचे सरकार तर आपल्या शेतकऱ्यांना डबल फायदा मिळवून देत आहे, असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले. दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते 23 हजार 300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : NASA मधील एरोस्पेस इंजीनिअर, खान्देशकन्या अनिमा पाटील-साबळे यांची मुलाखत