जळगाव, 21 ऑक्टोबर : विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्यासाठी विशेषतः तरूण वर्गाची गर्दी होत आहे. भोकर येथील शेकडो तरुणांनी देखील माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काल रविवारी 20 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या सर्व तरूणांचे स्वतः गुलाबराव देवकर यांनी पक्षाच्या वतीने स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी, उपाध्यक्ष नवल पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगराज सपकाळे व गोकूळ चव्हाण, भोकरचे माजी सरपंच हरीश पवार, ग्रा.पं.सदस्य रंगराव पवार तसेच दिलीप पवार, कोळी समाजाचे कार्यकर्ते पुंडलिक सोनवणे आदी उपस्थित होते.
‘यांनी’ केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश –
धनंजय सोनवणे, जितेंद्र बाविस्कर, जितेंद्र सोनवणे, भूषण ठाकरे, अजय सोनवणे, रंगराव पाटील, दिलीप पाटील, पवन सोनवणे, जयेश सोनवणे, राज सोनवणे, समाधान सोनवणे, सूरज सोनवणे, समाधान शिरसाट, भूषण सोनवणे, रोहित सोनवणे, मुकेश कोळी, समाधान धोबी, ओम सोनवणे, सागर सोनवणे, बळीराम सोनवणे, विकास सोनवणे, जगन सोनवणे, संजय सोनवणे, भरत सोनवणे, विशाल सोनवणे, रितेश सोनवणे, योगेश सोनवणे, सचिन सोनवणे, दत्तू सोनवणे, नरेंद्र सोनवणे, प्रवीण सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, चुनीलाल सोनवणे, नीलेश सोनवणे, विजय सोनवणे, नीलेश दंगल सोनवणे, ज्ञानेश्वर बाविस्कर, सुनील सोनवणे, राहुल सोनवणे, प्रदिप सोनवणे, दादू सोनवणे, खुशाल सोनवणे, विजय देविदास सोनवणे, विजय भिल, महेश सोनवणे, जगदिश सोनवणे, दिनेश कुंभार, अतूल ठाकरे, प्रेम सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
हेही वाचा : भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर; जळगाव जिल्ह्यात ‘या’ नवीन चेहऱ्याला संधी