ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 21 ऑक्टोबर : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात मी केलेला विकास हा ऐतिहासिक आहे आणि हीच जनता एक ऐतिहासिक निकाल येत्या 23 नोव्हेंबर रोजी देईल, असा निर्धार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, या मतदारसंघात आतापर्यंत कुणीही हॅट्रिक केलेली नाही. मात्र, ती हॅट्रिक मिळवून देण्यासाठी मतदारसंघातील जनता सज्ज झाली असल्याचा आत्मविश्वास मला आहे, असे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्यावतीने आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासोबत नुकताच संवाद साधण्यात आला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील केलेल्या विकासकामांबाबत माहिती देत मी केलेला विकास हा ऐतिहासिक आहे, असे त्यांनी सांगितले.
View this post on Instagram
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
आमदार किशोर आप्पा पाटील सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना म्हणाले की, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत कुणीही करू शकले नाही, अशी विकासकामे करण्याचा प्रयत्न या मतदारसंघात मी केलेला आहे. ही निवडणूक नेत्यांच्या नव्हे तर जनतेच्या हातात आहे. माझ्या मतदारसंघातील जनता ही जागृक आहे. यामुळे जनतेला माहितीये की, मी काय केलंय. आणि जनताच मला निवडून देईल, असा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला.
जनता ऐतिहासिक निकाल देणार –
ज्यापद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाच्या माध्यमातून एक इतिहास संपुर्ण महाराष्ट्रात रचला. स्वतःच्या नावार एक शिक्कामोर्तब केला. या महाराष्ट्रातील तमाम माता-बहिणींचा मुख्यमंत्री लाडका भाऊ म्हणून असे त्यांचे नाव अमर राहणार आहे. त्याच पद्धतीने या मतदारसंघात मी केलेला विकास हा ऐतिहासिक आहे आणि हीच जनता एक ऐतिहासिक निकाल येत्या 23 नोव्हेंबर रोजी देईल, असा निर्धार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : MLA Kishor Appa Interview : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची स्फोटक मुलाखत