• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे येऊन विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊयात – आमदार किशोर आप्पा पाटील

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 23, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे येऊन विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊयात – आमदार किशोर आप्पा पाटील

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

पाचोरा, 23 ऑक्टोबर : भूतकाळात लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडून अथवा शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ज्या काही चूका झाल्या असतील, ते विसरूया. आणि त्या चुका आता भविष्यकाळात होऊ नये त्यासाठी समिती नेमून त्यावर न्याय देण्याचा काम करूयात. मात्र, सध्यास्थितीत जो संदेश जातोय..तो अत्यंत चुकीचा आहे. म्हणून शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे येऊन विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊयात, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांसाठी समन्वय बैठक –
पाचोरा येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा शिवसेना प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समन्वय बैठकीचे आज 23 ऑक्टोबर रोजी दुपारी आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब दानवे यांच्यासह शिवसेना-भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सवाल –
केंद्रीय नेतृत्व म्हणजे गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात युती असल्याचे सांगतात. तसेच राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष सांगतात की, जे बंडखोरी करतील त्यांच्यावर कारवाई करू…हकालपट्टी करू. मात्र, मतदारसंघात जे भाजपचे बॅनर वापरून सत्ताधारी आमदारांवर टीका करताएत. मग तुम्ही त्यांच्यावर कारवाई का करत नाही, असा सवालही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उपस्थित केला.

दिशाभूल करणाऱ्यांची हकालपटी करण्याची मागणी –
मतदारसंघातील शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करावा. तसेच भाजप-शिवसेनेची महायुती असून या महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहून त्यांच्यासाठी काम करावे, असा संदेश तुम्ही त्यांना द्यावा, अशी मागणी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण तसेच जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्याकडे केली. तसेच कार्यकर्ते, पक्ष आणि नेत्यांची दिशाभूल करणाऱ्यांची हकालपटी करून आणि भारतीय जनता पार्टीचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला जबाबदारी द्यावी, अशी मागणीही आमदार पाटील यांनी यावेळी केली.

भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी –
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांसाठी समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सुरूवातीला भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, यानंतर आमदार मंगेश चव्हाण, खासदार स्मिता वाघ तसेच ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तसेच आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विजयासाठी सर्वांनी एकत्रित मिळून काम करण्याच्या सूचनाही त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या.

हेही पाहा :  शिवसेना प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समन्वय बैठकीतील आमदार किशोर आप्पा पाटील यांचे संपुर्ण भाषण

बातमी शेअर करा !
Share
Tags: kishor appa patil latest newsmla kishor appa patilpachora latest newsshivsena and bjp party workers coordination meetingsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाचा मोठा दिलासा; सरकारी सेवेतील ‘गट-क’ गणवेशधारी पदांवर १०% आरक्षण आणि लेखी-शारीरिक परीक्षेतून पूर्ण सूट

माजी अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाचा मोठा दिलासा; सरकारी सेवेतील ‘गट-क’ गणवेशधारी पदांवर १०% आरक्षण आणि लेखी-शारीरिक परीक्षेतून पूर्ण सूट

September 30, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा! ‘UDID’ कार्ड काढण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय

दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा! ‘UDID’ कार्ड काढण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय

September 30, 2026
कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक; जळगावातील रोजगार मेळाव्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे मत

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक; जळगावातील रोजगार मेळाव्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे मत

September 30, 2026
विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

विशेष सखोल पुनरिक्षण सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी 16 नोव्हेंबर रोजी होणार

September 29, 2026
विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 29, 2026
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page