• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मोठी बातमी! अखेर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं, नेमकं काय प्रकरण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 4, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
मोठी बातमी! अखेर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं, नेमकं काय प्रकरण?

मुंबई, 4 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मोठी बातमी सोर आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर असलेल्या रश्मी शुक्ला यांची अखेर बदली झाली आहे. काँग्रेस तसेच महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. दरम्यान, रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने काढले आहेत.

काँग्रेसने केला होता आरोप –
रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 रोजी समाप्त झाली. असे असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली होती, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. तसेच रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी केली आहेत, असा देखील आरोप नाना पटोले यांनी केला होता.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश –
नाना पटोले तसेच काँग्रेसच्या या आक्षेपानंतर आता भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला असून रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा आदेश आयोगाने दिले आहेत. विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या आक्षेपांनंतर निवडणूक आयोगाने तत्काळ प्रभावाने रश्मी शुक्ला यांची बदली करावी, असा आदेश दिलाय. रश्मी शुक्ला यांची बदली करून पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार शुक्ला यांच्यानंतरच्या सर्वांत वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवावा, असे देखील निर्देश निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार –
केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटविण्याचे आदेश दिले. तसेच उद्या (5 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजेपर्यंत तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नावे राज्याच्या प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पाठवायचे आहेत. त्याआधी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यावर राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

रश्मी शुक्ला कोण आहेत?
रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. त्या महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकार्‍यांपैकी एक आहेत. याआधी त्यांनी सशस्त्र सीमा बल (SSB) चे केंद्रप्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याशिवाय पुणे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रश्मी शुक्ला यांचे नाव राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते.

हेही वाचा : Breaking : मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीतून माघार, नेमका काय घेतला निर्णय? 

बातमी शेअर करा !
Share
Tags: dgp rashmi shuklaips rashmi shuklarashmi shuklasuvarna khandesh live newsunion election commitission

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora Taluka News: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण

Pachora Taluka News: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण

September 17, 2026
जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान;  लोकचळवळ म्हणून अभियान राबवा: ZP CEO करिश्मा नायर यांचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान;  लोकचळवळ म्हणून अभियान राबवा: ZP CEO करिश्मा नायर यांचे आवाहन

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ; जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात

सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ; जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात

September 17, 2026
“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

September 17, 2026
‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

September 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page