चंद्रकांत दुसाने, प्रतिनिधी
जळगाव, 5 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. काल सोमवारी माघारीची मुदत संपल्यानंतर आता सर्वच मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा उद्रेक दिसून येत आहे. माघारीची मुदत संपल्यानंतरही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या विरोधात काही बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत. खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा विचार केला असता याठिकाणी नेमकी कुणी बंडखोरी करत आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले, याबाबत सुवर्ण खान्देश लाईव्हचा हा स्पेशल रिपोर्ट.
जळगाव जिल्ह्यातील मतदारसंघ –
जळगाव शहर
डॉ. अश्विन सोनवणे (भाजप)
मयूर कापसे (भाजप)
कुलभूषण पाटील (उद्धवसेना)
एरंडोल
ए.टी. पाटील (भाजप)
हर्षल माने (उद्धवसेना)
अमित राजेंद्र पाटील (अ. पवार गट)
डॉ. संभाजीराजे पाटील (अ. पवार गट)
रावेर
दारा मोहम्मद (काँग्रेस)
अमळनेर
शिरीष चौधरी (भाजप)
पाचोरा
अमोल शिंदे (भाजप)
दिलीप वाघ (शरद पवार गट)
डॉ. निलकंठ पाटील (भाजप)
धुळे जिल्ह्यातील मतदारसंघ –
शिंदखेडा
डॉ. नीळकंठ पाटील (भाजप)
श्यामकांत सनेर (काँग्रेस)
शिरपूर
डॉ. जितेंद्रसिंह ठाकूर (शरद पवार गट)
धुळे ग्रामीण
हिलाल माळी (उद्धवसेना)
साक्री
मोहन सूर्यवंशी (भाजप)
नंदुरबार जिल्ह्यातील मतदारसंघ –
नंदुरबार
रवींद्र वळवी (शरद पवार गट)
अक्कलकुवा
डॉ. हीना गावीत (भाजप)
हेही वाचा – Special Report : पाचोऱ्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष, जळगाव जिल्ह्यात ‘या’ उमेदवारांमध्ये होणार काट्याची टक्कर