• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“नकारात्मक भावना अपयशाचे लक्षण तर सकारात्मकता हाच…” – संपादक नानक आहुजा

IIMC अमरावतीमध्ये ‘संपादक संवादाचे’ आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 27, 2023
in महाराष्ट्र
“नकारात्मक भावना अपयशाचे लक्षण तर सकारात्मकता हाच…” – संपादक नानक आहुजा

दैनिक प्रतिदिन अखबार आणि वृत्त केसरीचे प्रबंध संपादक नानक आहुजा विद्यार्थ्यांना संबोधित करताना.

अमरावती, 27 जानेवारी : विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार अंगिकारावे. सकारात्मक विचारांची माणसे जीवनात यशस्वी होतात. नकारात्मक भावना अपयशाची लक्षणे आहेत. त्यामुळे यश प्राप्तीसाठी सकारात्मक असणे गरजेचे आहे, असे मत दैनिक प्रतिदिन अखबार आणि वृत्त केसरीचे प्रबंध संपादक नानक आहुजा यांनी व्यक्त केले.

भारतीय जन संचार संस्थानच्या अमरावती विद्यापीठ परिसरातील पश्चिम क्षेत्रीय केंद्रात ‘संपादक संवाद’ उपक्रमाअंतर्गत आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नानकजी आहुजा ‘माध्यम व्यवस्थापन’ या विषयावर बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष क्षेत्रीय संचालक प्रा.(डॉ.) वीरेंद्र भारती होते. यावेळी विचारमंचावर शहरातील प्रसिद्ध उद्योगपती साहेब हुसैन सुभेदार यांचेसह प्रा. अनिल जाधव, डॉ. राजेश कुशवाहा, डॉ. विनोद निताळे, डॉ. आशिष दुबे उपस्थित होते.

वृत्तपत्र आणि टीव्ही दोघांचे जग हे वेगवेगळे – 

यावेळी, पुढे बोलताना नानक आहुजा म्हणाले, उत्तम माध्यम व्यवस्थापनासाठी सकारात्मक विचार, सर्वसमावेशक दृष्टी, कर्मचाऱ्यांशी चांगला समन्वय, जागरूकता आणि व्यावसायिक व सामाजिक भान हे तत्त्व स्वीकारणे गरजेचे आहे. सकारात्मक विचारांची पत्रकारिता नेहमी जीवंत राहते. त्यामुळे विद्यार्थांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात करिअर करताना सकारात्मक विचारांना आत्मसात करावे. तसेच पत्रकारितेचे क्षेत्र हे अतिशय जबाबदारीचे आहे , यात जागरूकपणे काम करावे लागते. वृत्तपत्र आणि टीव्ही दोघांचे जग हे वेगवेगळे आहे. तुलनेने वृत्तपत्रात कार्य करताना अधिक सजग असावे लागते. त्यामुळे पत्रकारितेत कार्य करताना जागरूकपणे कार्य करावे, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आयआयएमसीच्या विद्यार्थांनी व्यवस्थापनचे बारकावे समजून घेतले.

आयआयएमसीच्या वतीने संपादक नानकजी आहुजा यांचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय मनोगतात क्षेत्रीय संचालक प्रा. डॉ. वीरेंद्र कुमार भारती म्हणाले, लोकशाहीत प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. सामान्य माणसाच्या हिताचे रक्षण करणे पत्रकारितेचा मुख्य हेतू आहे. तो साध्य करण्यासाठी उत्तम व्यवस्थापन तितकेच गरजेचे आहे. माध्यमांच्या क्षेत्रात नवंनवीन बदल होत आहेत. बदलत्या काळात माध्यम व्यवस्थापकांची मागणी अधिक वाढली आहे. या क्षेत्रात रोजगार मिळविण्यासाठी विशेष कौशल्य आत्मसात करावी लागतील, चांगला टेक्नोसॅव्ही विद्यार्थी एक कुशल व्यवस्थापक देखील बनू शकतो. त्यामुळे विद्यार्थांनी तांत्रिक कौशल्य अधिकाधिक आत्मसात करावे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

आयआयएमसीच्या विद्यार्थांनी काढलेल्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील प्रायोगिक वृत्तपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिल जाधव यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत डॉ. राजेश कुशवाहा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनोद निताळे यांनी तर आभार डॉ. आशिष दुबे यांनी मानले. यावेळी मराठी, हिंदी आणि इंग्रजी पदव्यूत्तर पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसह राजेश झोलेकर, कोमल इंगळे, नुरूझुमा शेख, भूषण मोहोकार, अनंत नांदुरकर उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: iimc amravatiiimc amravati latest newsiimc newsnanak ahuja in iimc amravatisampadak samvaadsampadak samvaad iimc amravati

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

April 17, 2026
उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

April 17, 2026
‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

April 17, 2026
पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

April 17, 2026
कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

April 17, 2026
जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

April 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page