• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा बँक निवडणूक वाद: आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्व आरोप फेटाळले; लवकरच पत्रकार परिषदेत बाजू मांडणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 24, 2026
in जळगाव जिल्हा, चाळीसगाव, ताज्या बातम्या
जळगाव जिल्हा बँक निवडणूक वाद: आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्व आरोप फेटाळले; लवकरच पत्रकार परिषदेत बाजू मांडणार

जळगाव, 24 नोव्हेंबर: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जाच्या वादावरून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी पाचोऱ्याचे आमदार किशोर आप्पा पाटील आणि त्यांचे पुत्र सुमित पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जळगाव येथे सोमवार, २३ नोव्हेंबर  रोजी माध्यमांशी संवाद साधताना मंगेश चव्हाण यांनी किशोर आप्पा पाटील यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. एका गावातील बाप-लेकाच्या गोष्टीचा दाखला देत त्यांनी पाटील पिता-पुत्रावर टीका केली. तसेच उमेदवारी अर्ज वैध-अवैध ठरवण्यामागे नेमके काय घडले, याची संपूर्ण क्रमवार माहिती पत्रकार परिषदेत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार मंगेश चव्हाण काय म्हणाले? –

सुमित पाटील यांनी केलेल्या टीकेचे वडील म्हणून किशोर आप्पा पाटील यांनी समर्थन करणे अत्यंत अयोग्य असल्याचे मत मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केले. या संदर्भात बोलताना त्यांनी एक मार्मिक गोष्ट सांगितली. गावातील एका मुलाच्या तक्रारी घेऊन लोक जेव्हा त्याच्या वडिलांकडे जातात, तेव्हा स्वतः वडीलच घराच्या छतावर उभे राहून लघुशंका करताना दिसतात, असे सांगत त्यांनी पुढे “खाण तशी माती, बाप तसा बेटा……..” या ग्रामीण म्हणीचा वापर केला. ही गोष्ट त्यांना लागू पडत असेल, तर तो केवळ योगायोग समजावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘माझ्यावरील सर्व आरोप निराधार’ –

वडिलांकडून मुलाला समज दिली जाईल अशी अपेक्षा होती, मात्र आता फार काही अपेक्षा करण्याची गरज वाटत नाही, असे म्हणत त्यांनी किशोर आप्पा पाटील यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, आपण कोणाचेही हातपाय तोडण्याची भाषा केलेली नसून, आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचे मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केले.

‘संपुर्ण माहिती लवकरच पुराव्यानिशी जनतेसमोर मांडणार’ –

उमेदवारी अर्ज वैध-अवैध ठरवण्यामागे नेमके काय घडले, याची संपूर्ण क्रमवार माहिती (क्रोनॉलॉजी) आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन पुराव्यानिशी जनतेसमोर मांडणार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले. तसेच या संपूर्ण वादात यापुढे भाजपचे इतर आमदारही सक्रियपणे पुढाकार घेतील, असे सूचक विधान चव्हाण यांनी केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

हेही वाचा: गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsjdcc bank election 2026jdcc bank election disputemla mangesh chavansuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बँक निवडणूक वाद: आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्व आरोप फेटाळले; लवकरच पत्रकार परिषदेत बाजू मांडणार

जळगाव जिल्हा बँक निवडणूक वाद: आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्व आरोप फेटाळले; लवकरच पत्रकार परिषदेत बाजू मांडणार

November 24, 2026
गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

November 23, 2026
‘अन्याय झाला तर संताप केल्याशिवाय  राहणार नाही’; सुमित पाटील यांचा इशारा, बिनविरोध निवडीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले?

‘अन्याय झाला तर संताप केल्याशिवाय राहणार नाही’; सुमित पाटील यांचा इशारा, बिनविरोध निवडीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले?

November 22, 2026
“सुमित, तू काळजी करण्याची गरज नाही; तुझ्या वक्तव्याचे तुझा बाप समर्थन करतो” – आमदार किशोर आप्पा पाटील

“सुमित, तू काळजी करण्याची गरज नाही; तुझ्या वक्तव्याचे तुझा बाप समर्थन करतो” – आमदार किशोर आप्पा पाटील

November 22, 2026
राज्यातील अधिकाऱ्यांनी जनभावना जाणून काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

राज्यातील अधिकाऱ्यांनी जनभावना जाणून काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

November 21, 2026
राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

November 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page