मुंबई, 24 नोव्हेंबर : भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची आज रविवारी 24 नोव्हेंबर रोजी राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना – निवडून आलेल्या सदस्यांची यादी – व राजपत्राची प्रत सादर केली. दरम्यान, राज्यपाल विधानसभा निवडणुकीत बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देऊ शकणार आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांचे निकाल काल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 73 मधील तरतूदीनुसार, या निवडणूकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 24 नोव्हेंबर, 2024 च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली. सदर राजपत्र व अधिसूचनेच्या प्रती निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आज राज्यपालांना सादर केल्या.
यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास व कक्ष अधिकारी निरंजन कुमार शर्मा हे देखील उपस्थित होते.
हेही पाहा : Kishor Appa Patil Hattrick : ऐतिहासिक विजयानंतर आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? पहिलीच मुलाखत..