चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
शिरपूर (धुळे) – राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने अभूतपूर्व असे यश मिळवले आहे. तर महाविकास आघाडीचा दारूण असा पराभव झाला आहे. या वेळी लागलेल्या निकालाने अनेकांना धक्का बसला आहे. यामध्ये राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. तर काही अगदी काठावर निवडून आले आहेत. मात्र, यामध्ये खान्देशातील एका उमेदवाराने इतिहास रचत राज्यात सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा विक्रम केला आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार काशीराम वेचाण पावरा हे राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत. तब्बल 1 लाख 944 मतांच्या मताधिक्क्याने त्यांनी विजय मिळवला आहे. यामुळे त्यांच्याविरोधात लढणाऱ्या सर्व 5 उमेदवारांचे झिपॉझिट जप्त झाले आहे.
2019 मध्ये फुलले कमळ अन् आता रेकॉर्डही ब्रेक –
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या शिरपूर विधानसभा मतदारसंघात 2019 मध्येच भाजपने सुरुंग लावला होता. त्यावेळी दोन निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून येणाऱ्या काशिराम पावरांनी भाजपकडून उमेदवारी मिळवत निवडणूक लढवली आणि 2019 मध्ये हॅटट्रिक करत पुन्हा विधानसभा निवडणुकीत विजयाची मालिका कायम ठेवली. 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आल्याने शिरपूरमध्ये भाजपचे कमळ फुलले होते. यानंतर आता त्यांनी चौथ्यांदा विजय मिळवत यावेळी सर्वात जास्त मताधिक्क्याने निवडून येत राज्यात विक्रम केला आहे. याआधी शिरपूर तालुक्याच्या इतिहासात 1995 मध्ये अमरिशभाई पटेल हे सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आले होते. त्यांचा रेकॉर्ड आता काशीराम पावरांनी मोडला आहे.
कोण आहे काशीराम पावरा –
शिरपूर तालुका 1952 च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. दोन अपवाद वगळता तब्बल 72 वर्षे याठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व होते. शिरपूर मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार अमरीश पटेल हे 1990 पासून 2004 पर्यंत सलग चार वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, 2009 मध्ये हा मतदारसंघ राखीव झाल्याने काँग्रेसकडून काशीराम पावरा यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे आमदार पावरा यांनी 2009 आणि 2014 मध्ये विजय मिळवत विजयाची मालिका कायम ठेवत सलग दोन वेळा या मतदारसंघाच नेतृत्व केले. मात्र, एकेकाळी काँग्रेसचे आमदार असलेले अमरिशभाई पटेल यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला आणि तेव्हापासून याठिकाणी भाजपला बळ मिळाले.
Kishor Appa Patil Hattrick : ऐतिहासिक विजयानंतर आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? पहिलीच मुलाखत..