मुंबई, 28 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडली असतानाही राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी काँग्रेसला अति आत्मविश्वास नडल्याचे व्यक्तव्य केले. दरम्यान, मुंबईत गुलाबराव पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
बाळासाहेबांनी सांगितले होते की, ज्यादिवशी मी काँग्रेससोबत युती करेल त्यादिवशी मी माझे दुकान बंद करेल. म्हणून ज्यादिवशी हिंदुत्व, राज्य, धर्म सोडतो त्यादिवशी काय होते हे अंबादास दानवे यांच्या लक्षात आले असेल. मात्र, ठीक आहे. लेट आए दुरूस्त आले…अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आज ते मुंबईत माध्यमांसोबत बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार सोडलेल्या माणसाला एकदिवशी पश्चाताप होतो. म्हणून परमेश्वर त्यांचे भलं करो, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
अंबादास दानवे यांनी काय म्हटलं होतं? –
विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना अपेक्षित असे यश न मिळाल्याने अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेसच्या मनात जास्त आत्मविश्वास आला असावा. जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेस जिंकू शकत होती, अशी स्थिती होती. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा अतिआत्मविश्वास नडला असे अंबादास दानवे म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे आले असते तर 2-5 टक्के जास्त मते मिळाली असती, असेही दानवे म्हणाले.
हेही वाचा : राज्याला लागले नव्या मुख्यमंत्र्यांचे वेध अन् आता फैसला दिल्लीत, आज घोषणा होणार?