मुंबई, 29 नोव्हेंबर : महाराष्ट्रात तुम्हाला जर ईव्हीएमवर आक्षेप असेल तर तुम्ही निवडून आलेल्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीतील नेत्यांनी ईव्हीएमबाबत केलेल्या आरोपांवर मुनगंटीवार यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, नाना पटोले यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमचा विरोध हा ईव्हीएमवर नसून व्यवस्थेवर आहे, असे पटोले म्हणाले आहेत.
सुधीर मुनंगटीवार काय म्हणाले? –
महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मॅचफिक्सिंगमध्ये निवडून आलेत की, अंदर की बात है अन् काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हमारे साथ है…ते कसे निवडून आले…तुम्ही लोकसभेत कसे निवडून आलात…असे आहे की, महाराष्ट्रात तुम्हाला जर ईव्हीएमवर आक्षेप असेल तर तुम्ही निवडून आलेल्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtube.com/shorts/QoqaiztvHSs?si=oVhK3utmnnib653Chttps://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos
नाना पटोले यांचा पलटवार –
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाबाबत प्रत्युत्तर देताना सांगितले की, मी ईव्हीएम मशीनबाबत बोलतच नाहीये. मुनगंटीवार यांना काय वाटतं हे मला नाही. मात्र, निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणाली तसेच त्यांच्या व्यवस्थेवर आमचा आक्षेप आहे. आमचा मशीनवर आक्षेप नाहीये. त्यामुळे मी जनेतेचे प्रश्न मांडतोय. आम्ही मतदान केले नाही…हे निवडून आले कसे असे जनतेला वाटतंय. दरम्यान, मशीनवर माझा आक्षेप नसून निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणाली तसेच व्यवस्थापनावर आक्षेप असल्याचे नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा : धक्कादायक! गोंदिया जिल्ह्यात शिवशाही बसचा अपघात; 12 जणांचा मृत्यू