मुंबई, 2 डिसेंबर : राज्यात महायुतीला मोठं यश मिळाले असताना सत्तास्थापनेबाबत बैठका पार पडत आहेत. अशातच महायुतीतील तीनही पक्षातील नेत्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतच वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात असताना गुलाबराव पाटील यांनी केली वक्यव्याला राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.
गुलाबराव पाटील काय म्हणाले होते? –
अडीच वर्षात जे तुम्ही करू शकले नाही ते नाव लौकिक एकनाथ शिंदे यांनी केले. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाले. शेतकऱ्यांचे भाऊ झाले. तरुणांचे मित्र झाले. माय-बहिणांचे आशिर्वाद घेऊन ते लढतायएत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे हे उचित नाहीये. खरंतर, आम्ही फक्त 81 जागा लढवल्या. कदाचित अजित दादा महायुतीत आले नसते आणि त्याच जागा आमच्या पक्षाच्या वाटेला आल्या असत्या तर शिवसेनेच्या 90 ते 100 जागा तुम्हाला दिसल्या असत्या, असे गुलाबराव पाटील म्हणाले होते.
अमोल मिटकरी यांचे प्रत्युत्तर –
गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मिटकरी म्हणाले की, महायुतीत म्हणून एकत्र लढलो तर तीनही पक्षांनी एकत्र राहिले पाहिजे. तीनही पक्षांनी निवडणुकीत मेहनत घेतली. यामध्ये एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणीस यांनी घेतलेली मेहनत आम्ही नाकारत नाही. निवडणुकीतनंतर राज्यात अशापद्धतीची सत्ता आणल्यानंतर गुलाबराव पाटील असतील किंवा रामदास आठवले असतील यांच्याकडून अजित दादांना टारगेट केले जातेए आणि महायुतीत वितुष्ठता कशी निर्माण होईल, याचा प्रयत्न केला जातोय.
गुलाबराव पाटील यांच्यावर खोचक टीका –
गुलाबरावांनी समजून घ्यावे की तुम्ही गुलाबराव या नावासारखेच राहावे. तुमचा सुगंध हा कमी झाल्यासारखा दिसतोय. दरम्यान, कॅबीनेटमध्ये मंत्रीपदी काही वर्णी लागते की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. गुलाबरावांनी गुलाबरावसारखे राहावे, जुलाबराव होऊ नये, असा खोचक टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
हेही वाचा : जळगावात समर्थकांनी लावले ‘भावी उपमुख्यमंत्री’ म्हणून बॅनर; गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?