मुंबई : राज्यात सरकारस्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांकडून आजच गट नेत्याची निवड करण्यात आली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र भाजपच्या विधीमंडळ पक्षनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली. यानंतर महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथ घेणार आहेत. यासाठी महायुतीचे नेते आजच राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत.
चंद्रकांत दादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, यांनी मांडलेल्या प्रस्तावाला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर सर्व आमदारांनी अनुमोदन दिले. भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड प्रक्रिया गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण याच्या उपस्थितीत पार पडली. आज सकाळी विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आमदारांची बैठकीनंतर ही निवडप्रक्रिया पार पडली. यानंतर महायुतीचे नेते राजभवनात जाऊन राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा करतील.
बातमी अपडेट होत आहे…