मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन वेळा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची संधी सामान्य कार्यकर्त्याला दिली आणि जनतेने प्रचंड बहुमत दिले, यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला सांष्टांग दंडवत, या शब्दात भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महायुतीच्या सरकामध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील हे आता स्पष्ट झाले आहे. भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची भाजपा विधिमंडळ पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उद्या सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, पक्षनेता पदी निवड झाल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत आपल्या अडीच वर्षाच्या विरोधी पक्षनेतेपदावरही भाष्य केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –
ही निवडणूक ऐतिहासिक
या निवडणुकीने एक है सेफ है शिकवलं, आणि मोदी है मुमकीन है दाखवून दिलं.
महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो
अतिशय महत्त्वाचे हे वर्ष
संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने हे वर्ष महत्त्वाचं
राजमाता अहिल्यादेवी होळकर याचंही 300 वी जयंती वर्ष
अटलबिहारी वाजपेयी यांचंही 100 वे जयंतीवर्ष
मोठा जनादेश जनतेने दिला. जबाबदारी वाढली.
प्रचंड मोठ्या जबाबदारीची जाणीव करुन देणारा जनादेश
लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, युवा या सर्वांनी आणि समाजातील वंचित, दलित, आदिवासींनी दिलेल्या जनादेशाचे सन्मान राखण्याचे काम करणार
आश्वासनं पूर्ण करणार
महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणण्याकरिता कार्यरत राहणार
2019 मध्ये जनतेचा कौल मिळाला. मात्र, दुर्दैवाने तो कौल हिसकावून घेण्यात आला.
सुरुवातीच्या अडीच वर्षात वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्रास देण्यात आला
अशाही परिस्थितीत अडीच वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही
सगळे नेते संघर्ष करत होते. त्या संघर्षामुळे 2022 मध्ये आपलं सरकार स्थापन झालं.
आज पुन्हा एकदा महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले.
हा इतिहास अभूतपूर्व आहेत.
एका कार्यकर्त्याला या सर्वोच्च पदापर्यंत तीन वेळा बसवलं, त्यामुळे मोदीजींचे आभार.
हा पक्ष त्यांच्या नेतृत्त्वात मोठा झाला, त्यातून सामान्य कार्यकर्त्यांना चांगली पदे मिळाली.
यासर्वांसाठी मोदींजींचे, पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री, शीर्ष नेतृत्वाचे आभार.
तुम्ही आहात म्हणून मी इथे आहे. सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे आभार.
केवळ पदांकरिता आपण राजकारणात नाही.
येत्या काळात काही गोष्टी आपल्या मनप्रमाणे होती, काही विरोधात होतील.
आपली शक्ती निश्चितपणे दाखवून देऊ.
महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी 24 तास काम करू.
देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उद्या घेणार शपथ