मुंबई – भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तुमच्यासारखा निष्णांत वकील या खुर्चीवर बसला आणि या खुर्चीला न्याय देण्याचे काम आपण कराल, याबाबत माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही.
देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणांत काय म्हणाले –
आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल नार्वेकर यांनी विधानपरिषदेतही काम केले. तसेच कायद्यावर भाषण करताना राहुल नार्वेकर विधानपरिषदेचे सदस्य म्हणून बारकावे शोधून काढत त्यावर बोट ठेवण्याचे काम ते करत होते. कायदेमंडळाचा अध्यक्ष असल्याने कायद्याचे बारकावे माहीत असणे महत्त्वाचे आहे. त्यात मागची पाच वर्षे संक्रमणाचा काळ होता.
यात ज्या घडामोडी घडल्या त्यात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांकडे माध्यमांचे लक्ष होते. कदाचित सर्वाधिक चर्चेत राहिलेले राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष होते. त्यांच्या रुपाने न्यायप्रिय आणि संयमी व्यक्तिमत्व निवडलं गेले आहे ही आनंदाची बाब असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
मी आज विरोधी पक्षाचे, विरोधी पक्षातल्या सदस्यांचे आणि गटनेत्यांचे मी आभार मानतो की, त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या निवडीला पूर्ण समर्थन दिलं. आपल्याकडे विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडण्याची परंपरा आहे. ही परंपरा कायम राहिली. अध्यक्ष महोदय आपण मी पुन्हा येईन म्हटलं नव्हतं तरीही आपण परत आलात याचा मला आनंद आहे.
राज्यात दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री होते तेव्हा, त्या तिघांमधला एक वकील होता. आता तुमच्या रुपाने आणखी वकील विधानसभेत आहे, मला या गोष्टीचा आनंद आहे. तसेच राहुल नार्वेकर हे पहिलेच अध्यक्ष असतील पहिल्याच टर्ममध्ये ते अध्यक्ष झाले आणि त्यानंतर दुसऱ्यांदा ते अध्यक्ष झाले. नाना पटोलेंनी वाट मोकळी केल्याने ते अध्यक्ष झाले, त्यामुळे नाना पटोलेंचेही विशेष आभार, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नवनीत राणा म्हणाल्या खासदारांनी राजीनामा द्यावा अन्…, बळवंत वानखेडेंनी चॅलेंज स्विकारले