मुंबई, 9 डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालनंतर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर विधानसभेचे तीन दिवशीय विशेष अधिवेशन पार पडत आहे. दरम्यान, आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अॅड. राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आहे. सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे अॅड. राहुल नार्वेकर हे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे अध्यक्ष ठरले आहेत.
भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांनी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरला होता. यानंतर त्यांनी राहुल नार्वेकर यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दुसऱ्या कुणीही या पदासाठी अर्ज भरलेला नसल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार हे निश्चित मानले जात होते. दरम्यान, आज राहुल नार्वेकर यांची विधानसभेत बिनविरोध निवड करण्यात आली. सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे अॅड. राहुल नार्वेकर हे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे अध्यक्ष ठरले आहेत. यापूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे हे 1962 आणि 1967 असे दोन वेळा अध्यक्ष झाले होते.
कोण आहेत राहुल नार्वेकर? –
विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून कुलाबा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार अॅड. राहुल नार्वेकर दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत असून त्यांनी अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांसाठी वकील म्हणून बाजू मांडण्याचे काम केले आहे. तसेच अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून ते काम करायचे. मुंबई महापालिका तसेच इतर विषयांच्या संदर्भात दाखल याचिकेवर शिवसेनेची बाजू मांडण्याचे काम राहुल नार्वेकर करत असत. मात्र, 2019 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत कुलाबा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ते जिंकून आले होते. आता सलग दुसऱ्यांदा ते विधानसभेच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत.
हेही वाचा : नवनीत राणा म्हणाल्या खासदारांनी राजीनामा द्यावा अन्…, बळवंत वानखेडेंनी चॅलेंज स्विकारले