• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धरणगाव

एसटी बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, धरणगाव-चोपडा रस्त्यावरील धक्कादायक घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 14, 2024
in धरणगाव, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
ST bus-tractor Terrible accident one died on the spot shocking incident in Jalgaon district

एसटी बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

जळगाव : राज्यात गेल्या काही दिवसात अपघातांच्या घटनेमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील दोनगाव गावाजवळ एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात घडला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

धरणगाव-चोपडा रस्त्यावर पिंपळे फाट्याजवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला. तसेच या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या अपघातात बसमध्ये प्रवास करणारे 21 प्रवासीसुद्धा जखमी झाले आहेत. ही घटना आज शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. या भीषण अपघातातील जखमी बस चालकाची प्रकृती गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

काय आहे संपूर्ण घटना –

काल शुक्रवारी पहाटे धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट इलेक्ट्रिक पोलला धडकली होती. या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच आज दुसऱ्याच दिवशी आणखी एक धक्कादायक घटना घडली.

आज शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास धरणगाव चोपडा रोडवरील पिंपळे फाट्याजवळ बस अपघात झाला आहे. सुसाट वेगात असलेल्या बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, एकाचा जागीच मृत्यू झाला. तसेच एसटी बस ड्रायव्हरची केबिन पूर्णपणे चक्काचूर झाली. तसेच या अपघातात 21 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

कामराज सोनवणे असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कामराज सोनवणे चोपडा शहरातील प्रताप प्राथमिक विद्यालयात शिक्षक होते, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, या अपघातात एसटीचा ड्रायव्हर गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पवन देसले आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच वाहतूक सेवा सुरळीत करण्यात आली. तर सर्व जखमींवर धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Maharashtra Cabinet Expansion : अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला, उद्या नागपुरात होणार शपथविधी, कुणाला लागणार लॉटरी?

बातमी शेअर करा !
Share
Tags: accidentchopda newsdharangaon newsjalgaon accident newsjalgaon newsroad accident

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page