नागपूर – नागपुरात महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पार पडत आहे. यावेळी महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांनी मंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. दरम्यान, खान्देशातील 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली.
नागपुरातील उद्या 16 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून अधिवेशनाच्या पुर्व संध्येला राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी आतापर्यंत खान्देशातील 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
खान्देशातील ‘या’ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ –
गिरीश महाजन (जामनेर, जळगाव जिल्हा)
गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण, जळगाव जिल्हा)
संजय सावकारे (भुसावळ, जळगाव जिल्हा)
जयकुमार रावल (शिंदखेडा, धुळे)
बातमी अपडेट होत आहे…