नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’च्या वतीने खान्देशातील आमदारांशी खान्देशातील प्रश्नांवर, विधानसभा मतदारसंघातील विकासकामांवर संवाद साधला जात आहे. यामध्ये ‘सुवर्ण खान्दश लाईव्ह’ने जळगाव जिल्ह्यातील एरंडोल मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील यांच्याशी संवाद साधला. आमदार अमोल पाटील हे विधानसभेत पहिल्यांदाच निवडून आले असून त्यांचे हे पहिलेच अधिवेशन आहे. आपल्या पहिल्याच अधिवेशनात त्यांनी शेतकऱ्यांसदर्भात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन सांगितले.