नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा, 2022 साठी आपल्या अर्जात “खोटी माहिती आणि तथ्ये खोटे” केल्याचा आरोप असलेल्या माजी परिविक्षाधीन IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी दाखल केलेली अटकपूर्व जामीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली.
न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांनी खेडकर यांना अटकपूर्व जामीन नाकारला. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, खेडकर या वंचित गटांसाठी असलेल्या लाभांचा लाभ घेण्यासाठी प्रथमदर्शनी योग्य उमेदवार नाहीत आणि त्या बनावट कागदपत्रे बनवून लाभ घेत आहेत.
खेडकर यांनी उचललेले पाऊल हे व्यवस्थेत फेरफार करण्याच्या मोठ्या कटाचा एक भाग असून त्यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यास तपासावर परिणाम होईल.
दुसरीकडे पूजा खेडकर यांनी तपासात सहकार्य करणार असल्याचे सांगितले. सर्व पुरावे कागदोपत्री स्वरूपाचे असल्याने तिला कोठडीची आवश्यकता नाही, असा दावाही त्यांनी केला.
तर यूपीएससी ही जगातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक आहे, असे नमूद करून न्यायालयाने म्हटले की, खेडकर यांनी केवळ घटनात्मक संस्थाच नव्हे, तर समाजाचीही फसवणूक केली आहे. तसेच पूजा खेडकर यांनी दाखल केलेली अटकपूर्व जामीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली.
दुसरीकडे, या प्रकरणातील अन्य व्यक्तींचा सहभाग उघड करण्यासाठी पूजा खेडकरची कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले. या प्रकरणातील तक्रारदार यूपीएससीने खेडकरला “मास्टरमाइंड” म्हटले होते. ती ज्या प्रकारे सिस्टममध्ये आली आहे त्यावरून ती किती प्रभावशाली आहे हे स्पष्ट करते, असेही यूपीएससीने म्हटले होते.
पूजा खेडकरला अटक होणार –
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांनी दाखल केलेली अटकपूर्व जामीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.