• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

दोन लाखांची लाच घेताना सरपंचासह तिघांना अटक; चाळीसगाव तालुक्यातील नेमकं काय प्रकरण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 27, 2024
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
दोन लाखांची लाच घेताना सरपंचासह तिघांना अटक; चाळीसगाव तालुक्यातील नेमकं काय प्रकरण?

चाळीसगाव, 27 डिसेंबर : राज्यासह जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथून आणखी एक लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे. बहाळ येथे दोन लाखांची लाच घेताना सरपंचासह लिपक व पंटर अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. सरपंच राजेंद्र महादू मोरे (57), ग्रामपंचायत लिपीक शांताराम तुकाराम बोरसे (50) व पंटर सुरेश सोनू ठेंगे (40) अशी अटकेतील आरोपींची नावे असून धुळे लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे.

नेमकं काय प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे येथे 70 वर्षीय तक्रारदार यांची शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर ग्रामपंचायत, बहाळ हे त्यांचा हक्क दाखवून ही जागा परस्पर इतर व्यक्तीस भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता होती. त्यामुळे तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीविरुद्ध न्यायालयातून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला.

हेही पाहा : मुक्त विद्यापीठात शिक्षण, शिपाई ते आता आर्मीत मोठा अधिकारी lieutenant ashok patil khandesh interview

10 लाख रुपयांची मागितली लाच –
दरम्यान, सरपंच राजेंद्र मोरे याने तक्रारदार यांना भेटून त्यांच्या शेतजमिनीबाबत ग्रामपंचायतीकडून कुठलाही त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल, असे सांगितले. त्यास तक्रारदाराने नकार दिल्याने मोरे याने 10 लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत पाच लाखांवर तडजोड झाली.

अन् एसीबीने पकडले रंगेहाथ –
लाचेतील पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर गुरुवारी दुपारी मोरे याच्या घरात पंटर देंगे याने पैसे घेताच त्याला अटक करण्यात आली. नंतर सरपंच मोरे व लिपीक बोरसे यांना अटक करण्यात आली. दरम्यान, बहाळ येथील लाचप्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

कारवाईत यांचा समावेश –
बहाळ येथे लाचप्रकरणात केलेल्या कारवाईत धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक पंकज शिंदे, रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, सुधीर मोरे, रामदास बारेला, प्रवीण पाटील, जगदीश बडगुजर यांचा समावेश आहे.

हेही पाहा : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive

बातमी शेअर करा !
Share
Tags: bribe casechalisgaon bribe casedhule acbmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora Taluka News: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण

Pachora Taluka News: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण

September 17, 2026
जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान;  लोकचळवळ म्हणून अभियान राबवा: ZP CEO करिश्मा नायर यांचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान;  लोकचळवळ म्हणून अभियान राबवा: ZP CEO करिश्मा नायर यांचे आवाहन

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ; जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात

सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ; जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात

September 17, 2026
“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

September 17, 2026
‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

September 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page