ईसा तडवी, प्रतिनिधी
परधाडे (पाचोरा), 17 सप्टेंबर: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पाचोरा पंचायत समिती व परधाडे ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमास पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती तथा भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष बन्सीलाल पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंजने, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शुभम पाटील, परधाडे ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच सौरभ कांबळे तसेच ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष नंदू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या वृक्षांचे संगोपन करणेही आवश्यक असल्याचे उपस्थितांनी सांगितले. ग्रामस्थांनीही या उपक्रमात सहभागी होऊन वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.
कार्यक्रमास महेंद्र सोनवणे, सोनू पाटील, शुभम पाटील, विनोद पाटील, नंदू ठाकरे, अशोक पाटील, समाधान ठाकरे, भिकन ठाकरे यांच्यासह परधाडे येथील आशा सेविका भातखंडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन परधाडे ग्रामविकास अधिकारी बोरसे आप्पा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
हेही वाचा: सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे






