• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

…..अन् शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी ‘अशा’ पद्धतीने स्विकारला पदभार, नेमकी बातमी काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 31, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
…..अन् शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी ‘अशा’ पद्धतीने स्विकारला पदभार, नेमकी बातमी काय?

मुंबई, 31 डिसेंबर : राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाल्यानंतर संबंधित खात्यांचे मंत्री पदभार स्विकरत आहेत. अशातच काल 30 डिसेंबर रोजी राज्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांनी ज्यापद्धतीने पदभार स्विकारला त्याची राज्यभर चर्चा होत आहे. नाशिकमधील शालेय विद्यार्थ्यांना सहलीच्या माध्यमातून मंत्रालयात नेत त्यांच्या उपस्थितीत दादा भूसे यांनी शालेय शिक्षणमंत्री म्हणून पदभार स्विकारला.

नेमकी बातमी काय? –
शिवसेना शिंदे गटाचे जेष्ठ नेते दादा भूसे यांना महायुती सरकारमध्ये शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खाजगी संस्था, समाज कल्याण, आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील 50 विद्यार्थ्यांसोबत ते बसमधून काल मंत्रालयाकडे रवाना झाले. यानंतर या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत त्यांनी मंत्रालयात शालेय शिक्षणमंत्री म्हणून पदभार स्विकारला. मंत्री दादा भूसे यांची प्रतिक्रिया –
शालेय शिक्षणमंत्री म्हणून पदभार स्विकारल्यानंतर दादा भूसे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे हित हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल. शिक्षण क्षेत्रात नवनवीन धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करू. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या समान आणि सुलभ संधी मिळाल्या पाहिजेत. शिक्षणाच्या अभावामुळे कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची खास खबरदारी घेतली जाईल.

दादा भूसे पुढे म्हणाले की, योग्य पद्धतीने काम करून सकारात्मक बदल घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. विभागासाठी रोडमॅप निश्चित करून काम सुरू करण्यात येईल. अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिले जातील. शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांसोबत एकजुटीने काम करून विभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल. दरम्यान, पालकांकडूनही अपेक्षा आणि सूचना घेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा घडवण्याचा उद्देश आहे असेही मंत्री भूसे यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री पंकज भोयार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही पाहा : Success Story : भाऊ-बहिणीची सैन्यदलात निवड; एकाच कुटुंबातील 4 भावंडं देशसेवेसाठी सज्ज

बातमी शेअर करा !
Share
Tags: dada bhusemarathi newsminister dada bhuseschool education ministersuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page