• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘…अन्यथा होणार दंडात्मक कारवाई !’ आजपासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती; डॉ. महेश्वर रेड्डींचे आदेश नेमका काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 1, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
‘…अन्यथा होणार दंडात्मक कारवाई !’ आजपासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती; डॉ. महेश्वर रेड्डींचे आदेश नेमका काय?

जळगाव, 1 जानेवारी : जळगाव शहरासह जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावरून वाहनचालकांच्या बेशिस्त वर्तनाबरोबरच प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. अशातच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हेल्मेट सक्तीचे आदेश काढले आहेत. आज 1 जानेवारीपासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आली असून दुचाकी चालक व मागे बसणारा अशा दोघांना आता हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डींचे आदेश –
जळगाव जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काल दुचाकीवरून प्रवेश करणाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे आदेश काढले आहेत. दुचाकी चालक व मागे बसणाऱ्याला हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्गावरून चार वर्षांवरील प्रत्येकाला दुचाकीवरून प्रवास करत असताना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव शहरात जरी हेल्मेट सक्ती करण्यात आली नसली तरी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर तसेच महामार्गावरील चौकांमध्ये हेल्मेट घालणे बंधनकारक राहणार आहे.

हेही पाहा : Video : “….तर कदाचित ही अपघाताची घटना घडली नसती”; डंपर अपघात प्रकरणावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रतिक्रिया

चार वर्षांवरील व्यक्तींना हेल्मेट बंधनकारक –
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर 2024 मध्ये 561 अपघाताच्या घटना घडल्या. यामध्ये 441 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे दुचाकीचालक व मागे बसणारा यांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्गावर मोटार वाहन कायद्यानुसार चार वर्षांवरील प्रत्येकाला हेल्मेट अनिवार्य केले आहे. दरम्यान, महामार्गावर होणारे दुचाकी अपघात व त्यात होणारे मृत्यू पाहता नागरिकांची सुरक्षितता महत्वाची आहे. त्यासाठी महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.

…अन्यथा होणार दंडात्मक कारवाई –
मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 129 नुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी वाहन चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच हेल्मेट नसल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही या नमूद करण्यात आले आहे.

Video : Success Story : भाऊ-बहिणीची सैन्यदलात निवड; एकाच कुटुंबातील 4 भावंडं देशसेवेसाठी सज्ज

बातमी शेअर करा !
Share
Tags: helmetshelmets mandatoryhelmets mandatory on national highwaysjalgaon newsjalgaon sp maheshwar reddymarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

August 2, 2026
लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

August 2, 2026
VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page