मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 7 जानेवारी : चोपडा शहरात सीसीआय आणि कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे राधे राधे जिनिंग फॅक्टरीमध्ये काल 6 जानेवारी रोजी हमीभावाने कापुस खरेदी सुरू करण्यात आली. याप्रसंगी प्रसंगी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांचे हस्ते काटा पुजन व कापुस मालाचे पुजन करण्यांत आले.
चोपड्यात सी.सी.आय. मार्फत कापूस खरेदी सुरू –
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या सर्वांच्या प्रयत्नांतून संपुर्ण महाराष्ट्रात सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. याप्रमाणेच चोपड्यात देखील आज सी.सी.आय. मार्फत कापूस खरेदी सुरू झाली असल्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले.
योग्य भाव मिळण्यासाठी चोपड्यातील सीसीआय केंद्राला कापूस आणावा. जर शेतकऱ्यांचा कापूस थोडा खराब असेल तर सीसीआयच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलून तो कापूस खरेदी केला जाईल, यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच शेतकऱ्यांना याठिकाणी कापूस आणताना कुठल्याही पद्धतीने वाद निर्माण होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी. दरम्यान, शेवटच्या बोडापर्यंत शेतकऱ्याचा कापूस खरेदी केला जाईल, असे आश्वासन आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिले.
यांची होती उपस्थिती –
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, सी.सी.आयचे केंद्र प्रमुख योगेश थाळनेरकर, बाजार समिती सभापती नरेंद्र वसंतराव पाटील, उपसभापती विनायकराव रामदास चव्हाण, संचालक सुनिल जैन, अँड. घनश्याम पाटील, गोपाल पाटील, अँड. शिवराज पाटील, किरण देवराज, मिलींद पाटील, वसंत पाटील, मनोज सनेर, नंदकिशोर सांगोरे, सुनिल अग्रवाल जिनींग मालक अशोक अग्रवाल, विक्की अग्रवाल, इतर मान्यवर, शेतकरी वर्ग बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनवणे, उपसचिव जितेंद्र देशमुख, नितीन बडगुजर, आदी उपस्थित होते.
हेही वाचा : राज्यात थंडीचं कमबॅक; वातावरणात गारठा वाढला; जळगावचे पुढील दोन दिवसाचा हवामान अंदाज नेमका काय?