• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी! किती असेल कमीत कमी पगार अन् पेन्शन किती वाढणार?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 17, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
Approval for the establishment of the Eighth Central Pay Commission

आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच घोषणा केली की, 2026 पर्यंत आयोगाची स्थापना होण्याची शक्यता आहे. जवळपास दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग जाहीर करण्याची परंपरा कायम ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे.

काय आहे आठवा वेतन आयोग –

भारत सरकारने स्थापन केलेला वेतन आयोग केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे वेतन आणि भत्ते ठरवतो. आठवा वेतन आयोग वेतन आणि निवृत्ती वेतन संरचनेत सुधारणा करण्याची शिफारस करेल. यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते वाढतील.

कुणाला मिळणार लाभ –

केंद्र सरकारच्या 49 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाचा फायदा होणार आहे. दरम्यान, सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ डिसेंबर 2025 मध्ये संपत आहे. तर 2025 मध्ये नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेसह, शिफारशी वेळेवर प्राप्त होतील, ज्यामुळे 7 व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित होईल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार –

8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संकेत दिले आहेत की तो 2026 पर्यंत आणला जाऊ शकतो. यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे पगार, भत्ते आणि निवृत्ती वेतनात सुधारणा होईल. भारतात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या संरचनेनुसार वेतन मिळते. सुरुवातीला, 28 फेब्रुवारी 2014 रोजी भारत सरकारने 7 व्या केंद्रीय वेतन आयोगाची (CPC) स्थापना केली. मागच्या वेळी सातव्या वेतन आयोगाचा अहवाल अंतिम करण्यासाठी 18 महिने लागले होते. यानंतर त्याला जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आले होते.

किती पगार वाढण्याची शक्यता –

8व्या वेतन आयोगाच्या संभाव्य शिफारशींनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून अंदाजे 34,560 रुपयांपर्यंत वाढू शकते. यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. यासोबतच पेन्शनही त्यानुसार 17,280 रुपयांपर्यंत वाढू शकते.

हेही वाचा – अमळनेर तालुक्यात प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न; विजेत्या विद्यार्थ्यांना इस्रो दौऱ्याची संधी

बातमी शेअर करा !
Share
Tags: ashwini vaishnaweighth pay commissionmodi governmentmodi sarkarunion government

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page