• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अमळनेर तालुक्यात प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न; विजेत्या विद्यार्थ्यांना इस्रो दौऱ्याची संधी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 17, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
अमळनेर तालुक्यात प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न; विजेत्या विद्यार्थ्यांना इस्रो दौऱ्याची संधी

जळगाव, 17 जानेवारी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम अमळनेर येथील पिंपळे तालुक्यातील अनुदानित आश्रम शाळेत संपन्न झाला. या प्रदर्शनात 17 शासकीय व 34 अनुदानित आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व सर्जनशील उपकरणे सादर केली. यावेळी उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक असे तीन गट तयार करण्यात आले होते ज्यात चार बीटमधून प्रत्येक गटातील सर्वोत्तम तीन उपकरणांना प्रदर्शनासाठी निवडण्यात आले. या प्रदर्शनात अनुक्रमे 14, 12 आणि 26 उपकरणांचा सहभाग होता.

प्रदर्शनातील विजेत्या विद्यार्थ्यांना इस्रो दौऱ्याची संधी –
या कार्यक्रमाचे उद्घाटन यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात अरुण पवार यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याचे महत्त्व पटवून दिले आणि प्रयोगशीलता व नाविन्यपूर्णतेला चालना देण्याचे आवाहन केले. प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्या विद्यार्थ्यांना इस्रो (ISRO) दौऱ्यावर नेले जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

समारोप व बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान अनिल झोपे, प्राचार्य, डायट जळगाव यांनी भूषवले. यावेळी अनिल झोपे यांनी डायट जळगावच्या वतीने आदिवासी आश्रम शाळांसाठी शैक्षणिक मदत व सुधारणा यासाठी कायमस्वरूपी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तीनही गटातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शाळांना स्टेट बँक ऑफ इंडिया, यावल यांच्या वतीने इन्सिनरेटर भेट देण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय स्टेट बँकचे क्षेत्रीय व्यवस्थापक धर्मेंद्र कुमार सिंग यावलचे शाखा व्यवस्थापक राधेश्याम ताराचंद मूंगमुळे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. सी. डी. साळुंखे, विद्या पाटील, युवराज पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे निरीक्षण व मूल्यांकन कार्य विज्ञान शिक्षक निरंजन पेंढारे, बी. बी. ठाकरे व डी. के. पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहा प्रकल्प अधिकारी पवन पाटील व इतर अधिकारी व कर्मचारी शिक्षण विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल व अनुदानित आश्रम शाळा, पिंपळे यांच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

हेही वाचा : Video : मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर बॉडीगार्ड व पोलिसांत राडा; नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ…

बातमी शेअर करा !
Share
Tags: amalner latest newsmarathi newsproject level science exhibitionsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

June 12, 2026
‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

June 12, 2026
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा; प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा; प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

June 12, 2026
VIDEO | पाचोऱ्यात ‘जनसमाधान बैठक’ संपन्न; अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे निर्देश

VIDEO | पाचोऱ्यात ‘जनसमाधान बैठक’ संपन्न; अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे निर्देश

June 11, 2026
PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

June 10, 2026
महायुती सरकारचा मोठा निर्णय! मंत्रालयातील ३३ विभाग आता होणार ४५, कोणते विभाग होणार स्वतंत्र?

महायुती सरकारचा मोठा निर्णय! मंत्रालयातील ३३ विभाग आता होणार ४५, कोणते विभाग होणार स्वतंत्र?

June 10, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page