जळगाव, 17 जानेवारी : जळगाव एमआयडीसीमध्ये मनसे नेत्याने थेट परप्रांतीय व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली आहे. जळगावातील एमआयडीसीतील एका कंपनीत मराठी कामगारांवर अन्याय केल्याचा आरोप झाल्यानंतर मनसेचे महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी थेट कंपनीचे मॅनेजर यांच्या कानाखाली लगावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव एमआयडीसीतील एका कंपनीत मराठी कामगारावर वारंवार अन्याय होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह थेट कंपनीत धडक दिली. शिंदे यांनी यावेळी परप्रांतीय व्यवस्थापकाकडे जाब विचारत असताना कामगारांनी त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत माहिती दिली. दोन महिन्यांपासून पगार दिला नसल्याचा आरोपही या कामगारांनी केला आहे. अशातच विनोद शिंदे यांनी थेट कंपनीचे मॅनेजर यांच्या कानाखाली लगावली.
…अन् व्हिडिओ व्हायरल –
जळगावमधील एमआयडीसीतील एका कंपनीत मराठी कामगारांवर अन्याय केला जात असल्यावरून सदर कंपनीच्या परप्रांतीय व्यवस्थापकाकडे जाब विचारला. यावेळी मनसे पदाधिकाऱ्याने थेट मनसे स्टाईलमध्ये व्यवस्थापकाकडे कानशिलात लगावली. दरम्यान, ह्या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पीएम किसान योजनेसाठी आता कुटुंबाचे आधार बंधनकारक; नेमकी बातमी काय?