मुंबई, 21 जानेवारी : राज्यातील गडकिल्ल्यांसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे गडकिल्ल्यांवर होणाऱ्या अतिक्रमणाने गुदमणारे किल्ले आता मोकळा श्वास घेणार आहेत. गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील येत्या 31 मे पर्यंत अतिक्रमणे हटवण्यात येणार असल्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
अतिक्रमण हटवण्याचे आदेश –
राज्यात केंद्र संरक्षित 47 किल्ले तसेच राज्य संरक्षित 62 किल्ले आहेत. राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिक्रमणांची यादी मागवली आहे. तसेच 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, पुन्हा अतिक्रमण होऊ नये तसेच किल्ल्यांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
दक्षता समितीची स्थापना –
राज्य सरकार गडकिल्ल्यांच्या सौंदर्याचे जतन करण्याचे काम करणार असून यासाठी किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यात येणार आहेत. तसेच पुढे भविष्यात अतिक्रमण होऊ नये, यासाठी देखील सरकारने दक्षता समितीची देखील स्थापना केली आहे. दरम्यान, सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील गडकिल्ल्यांसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतलाय. या अतिक्रमणांमुळे गुदमणारे किल्ले आता मोकळा श्वास घेणार आहेत.
सरकारची आक्रमक भूमिका –
गेल्या काही महिन्यांपुर्वी विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणानंतर गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरम्यान, विशाळगडाप्रमाणे राज्यातील अनेक गड किल्ले देखील अतिक्रमित असल्याची बाब समोर आल्यानंतर सरकारने त्याबाबत काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, अशी प्रकारची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. या पार्श्वभूमीवर सरकारने आक्रमक भूमिका घेत मोठे निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : Dhule Crime News : किरकोळ वाद अन् घडलं भयानक, मित्रानेच मित्राला संपवलं, धुळ्यातील हादरवणारी घटना