नंदुरबार, 26 जानेवारी : सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेल्या 3 हजार 799 शेतकऱ्यांचा 28.74 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार राजेश पाडवी यांनी कृषीमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली आहे. माणिकराव कोकाटे हे आज प्रजासत्ताकदिनानिमित्त नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असताना आमदार राजेश पाडवी यांनी त्यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या निधीबाबतच्या मागणीचे निवेदन दिले आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि एनएएफसीसी योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत येणाऱ्या एकूण 3 हजार 799 शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचन घटकासाठी निवड झालेली आहे. मात्र 2023-24 यावर्षी निवड झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही उपलब्ध न झाल्याने शेतकरी आता हतबल झालेला आहे. शेतकऱ्यांच्या प्रस्तावावर पेमेंट इन प्रोसेसच्या शेरा देण्यात आलेला आहे. याचे एकूण अनुदानाची रक्कम ही 28 कोटी 74 लाख इतकी रक्कम कृषी विभागाच्या माध्यमातून अनुदान करण्याचे बाकी आहे. परिणामी निवड झालेल्या शेतकऱ्यांना वारंवार या गोष्टीचा पाठपुरवठा करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या या समस्या गंभीर असून त्या सोडवण्यासाठी शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी राज्याचे कृषिमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे निवेदन देऊन 3 हजार 799 शेतकऱ्यांचे अनुदान लवकरात लवकर मिळून द्यावा, अशी मागणी केली आहे.
आमदार राजेश पाडवी यांचे निवेदन –
शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील एकूण 3 हजार 799 शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचन घटकात निवड झालेली आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून त्यांना अनुदान उपलब्ध न झाल्यामुळे ते वारंवार माझ्याकडे यासंदर्भातील तक्रार करत होते. या विषयावर मी हिवाळी अधिवेशनात देखील शासनाचा लक्षात आणून दिली. यानंतर आता राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे लवकरात लवकर अनुदान मिळून द्यावा, यासाठी निवेदन दिले आहे.
कृषीमंत्र्यांनी दिले आश्वासन –
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसंदर्भातील समस्या आमदार राजेश पाडवी यांनी लक्षात आणून दिली आहे. लवकरच या विषयावर तोडगा काढून शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन कृषीमंत्री तथा पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहे.
हेही वाचा : VIDEO : अमळनेरच्या तरुणीने केलं पंतप्रधान मोदीचं कौतुक; दिल्लीत नेमकं काय म्हणाली?