सत्य आणि अंहिसेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या जीवनप्रवासाने फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील लोकांनाही प्रेरणा दिली. आज महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज’ने महात्मा गांधींचे पणतु आणि लेखक तुषार गांधी यांची विशेष मुलाखत घेतली. तुषार गांधी यांना शांतता आणि अहिंसेसाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल नुकताच अमेरिकेच्या जॉर्ज मेसॉन विद्यापीठाच्या द कार्टर स्कूल ऑफ अॅडव्हायझर यांच्या वतीने ‘2024 अॅम्बेसेडर जॉन डब्ल्यू मॅकडोनाल्ड पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलंय. अहिंसेची शिकवण देणारे बापू हे तुषार गांधींना नेमके कसे समजले, कसे उमगले, सध्याच्या परिस्थतीवरील घडणाऱ्या घटनांवर त्यांचं मत काय आहे, या सर्व विषयांवर त्यांनी यावेळी परखडपणे आपली मते मांडली.