नुकताच भारतीय महिला आणि पुरुष संघाने खो-खो विश्वचषक जिंकला. यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही संघांचं नेतृत्त्व हे महाराष्ट्रातील खेळाडूंनी केलं. यामध्ये भारतीय महिला खो-खो संघाचं नेतृत्व महाराष्ट्राच्या प्रियंका इंगळे हिने केलं. भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या टीमने तिची विशेष मुलाखत घेतली. यावेळी तिने आपल्या स्पर्धेसाठी केलेली तयारी, आगामी काळातील तिचं व्हिजन, तसेच तरुणाईला महत्त्वाचा सल्ला दिला.