मुंबई, 4 फेब्रुवारी : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी खात्यात तब्बल पावणे तीनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. यावर धनंजय मुंडे यांनी दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेत ‘अंजलीताई बदनामीया’ असा उल्लेख त्यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
अंजली दमानिया यांचे खळबळजनक आरोप –
अंजली दमानिया आज सकाळी पत्रकार परिषदेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कोट्यवधी रूपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले. धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्रीपदाच्या काळात नॅनो युरिआ, नॅनो डीएपी, बॅट्री स्पेअर, मेटाल्डे हाईट आणि कापूस बॅगा यांच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप दमानिया यांनी केला. कृषी आयुक्तांचा आक्षेप असतानाही कृषी साहित्यांच्या खरेदीत बाजारभावापेक्षाही चढ्या भावाने खरेदी केल्याचाही दावा त्यांनी केला.
नॅनो युरिआची 500 मिलीमीटरची बाटली 92 रुपयांना मिळते. पण धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली हीच बॉटल 220 रुपयांना खरेदी करण्याचे टेंडर काढण्यात आले होते. तसेच नॅनो डीएपची 269 रुपयांची एक बाटली 590 रुपयांना खरेदी करण्यात आली. यासोबतच बॅटरी स्प्रेअरचा बाजारभाव 2496 रुपये असताना कृषी खात्याने एक स्प्रेअर 3425 रुपयांना विकत घेण्यात आल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला. मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळले –
मंत्री धनंजय मुंडे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, साहित्य खरेदीबाबत मी कृषी मंत्री असताना जे आरोप केले त्याबाबत माझ्यावर आरोप केले आणि हे पुन्हा एकदा त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणे आणि धांदात खोटे आरोप करणे यापलिकडे यात काही नाहीये. दरम्यान, सनसनाटी आरोप करायचे धांदात खोटे आरोप करायचे आणि स्वत:ची प्रसिद्ध करायची अन् यापलिकडे काही दिसत नाही, असा आरोप मंत्री मुंडे यांनी केला.मंत्री धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, एक विषय झाला तर दुसरा विषय काढायचा आणि काय करायचयं? माझी अंजली ताई बदनामीया यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचा काम ज्याने कुणी दिले असेल त्यांना अंजली दमानियांना माझ्याकडून शुभेच्छा आहे. दरम्यान, साप म्हणून भूई थोपाटणे आणि मीडियातून सनसनाटी निर्माण करणं यासोबतच एखाद्याचं राजकीय आणि सामाजिक आयुष्य संपवणे एवढे सोपं नसते”, असेही मंत्री मुंडे म्हणाले आहेत.संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत बोलू शकत नाही –
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तसेच सीआयडी आणि न्यायालयीन चौकशीद्वारे या हत्येचा तपास केला जात आहे. असे असताना मी संवैधानिक पदावर असल्याने स्व. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाबाबत मी बोलू शकत नाही, असे मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी, अशी आमच्या सरकारची भूमिका असल्याचे मंत्री मुंडे म्हणाले.
हेही पाहा : Video : ‘छत्रपती शिवाजी महाराज, भगवद्गीता यांचं आयुष्यात मोठं स्थान’, Kho Kho Team Captain Pratik Waikar