ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगाव (हरे.), 8 फेब्रुवारी : पिंपळगांव हरे पोलिस स्टेशन अंतर्गत 18 जानेवारी रोजी चोरी प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपीस पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी अटक केली असून रोहित सुधाकर चौधरी (रा. कळमसरा ता.पाचोरा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चोरीसाठी मित्राच्या मानेला चाकू लावत त्याला जखमी केले होते अन् त्याच्यापासून 54 हजार लुटले. यानंतर तो फरार होता. दरम्यान, पिंपळगाव पोलिसांना फरार आरोपीस पकडण्यात यश आलंय.
काय आहे संपुर्ण बातमी? –
अजय वासुदेव बोधडे (रा. वसाडी, ता.नांदुरा ह.मु.एरंडोल) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानुसार, अजय व रोहित हे एकाच कंपनीत कामाला होते. दरम्यान, रोहितने अजय बोधडे यांच्या मानेवर चाकू लावून त्याला जखमी केले. यावेळी त्याच्याकडे असलेले महिला बचत गटाचे वसुली केलेले एकूण 31 हजार 61 रोख रूपये, 3000 रूपये किंमतीचा रेड मी कंपनीचा मोबाईल तसेच सॅमसंग कंपनीचा किंमतींचा 20 हजार रुपये चा टॅब व चार्जर असा एकूण 54 हजार 061 रूपयांचा माल रोहित चौधरी हा संशयित आरोपी हिसकावून पळला होता. याप्रकरणी 18 जानेवारी रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 08/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309(6) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. …अन् फरार आरोपीस पोलिसांनी केली अटक –
याप्रकरणातील संशयित आरोपी रोहित सुधाकर चौधरी हा त्याच्या गावात आल्याची माहिती पिंपळगाव हरे. पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांना मिळाली. दरम्यान, सपोनी प्रकाश काळे यांना माहिती मिळाल्या सहायक फौजदार अरविंद मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद वडीले यांनी 5 फेब्रुवारी रोजी कळमसरा गावातून त्याब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला एक चाकू,70000 रू किंमतीची बजाज पल्सर, फिर्यादीचे हिसकावलेले 30 हजार रुपये रोख असे जप्त केले आहे. पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी सपोनी प्रकाश काळे, उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, पोहेकॉ शैलेश चव्हाण, प्रमोद वाडीले, अतुल पवार, दीपक अहिरे, योगेश भिलखेडे यांनी मदत केली.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत