• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

जशोदाबेन मोदी यांच्या हस्ते अ‍ॅड. बबिता दिलीप गाडेकर लिखित ‘हुंदका’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 10, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
जशोदाबेन मोदी यांच्या हस्ते अ‍ॅड. बबिता दिलीप गाडेकर लिखित ‘हुंदका’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

छत्रपती संभाजीनगर, 10 फेब्रुवारी : छत्रपती संभाजीनगरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी यांच्या हस्ते अ‍ॅड. बबिता दिलीप गाडेकर लिखित ‘हुंदका’ या महिला व बालकांवर आधारित कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा 8 फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी ‘हुंदका’ कवितासंग्रह महिलांच्या हक्कांसाठी एक सशक्त आवाज ठरेल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नी जशोदाबेन मोदी हस्ते प्रकाशन –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी भेटी दिल्या. या भेटी दरम्यानच त्यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरात ‘हुंदका’ कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, 2019 साली याच इमारतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते Auric हॉल, शेंद्रा एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर सिटीच्या बिल्डिंगचे उद्घाटन झाले होते. दरम्यान, योगायोगाने त्याच ठिकाणी त्यांच्या धर्मपत्नीच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले.

‘हुंदका’ कवितासंग्रहाच्या प्रकाशनासाठी आयोजित केलेल्या या सोहळ्यास महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी फ. मु. शिंदे, कासार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद भांडेकर, प्रशांत बंब यांचे खाजगी सचिव संदीप चिमटे तसेच उद्योगपती डॉ. प्रितेश चौधरी, तांडव प्रतिष्ठान उपाध्यक्ष मयूर हटकर, सचिव जयकुमार माळी यांच्यासह परिसरातील कलाकार, साहित्यिक, पत्रकार, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित लाभली.तांडव प्रतिष्ठानच्यावतीने प्रकाशन सोहळ्याचे आयोजन –
तांडव प्रतिष्ठानच्या माध्यमातून हुंदका’ कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा प्रकाशन सोहळा तांडव प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र जनार्धन घडमोडे यांच्या पुढाकाराने आणि नियोजनातून यशस्वीपणे पार पडला. दरम्यान, या प्रकाशन सोहळ्यात एमजीएम कॉलेजच्या एमबीए मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला.तसेच यशवंतराव कला महाविद्यालयातील प्राध्यापिका सरिता उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कवितांच्या संकल्पनेवर आधारित सुंदर चित्रकृती साकारून कार्यक्रमाच्या सौंदर्यात भर घातली.महिला व बालकांच्या प्रश्नांवरील संवेदनशील लेखन –
छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालयात मागील 10 ते 12 वर्षांपासून अ‍ॅड. बबिता गाडेकर या वकिली व्यवसायात कार्यरत आहेत. कौटुंबिक प्रकरणांमध्ये नवरा-बायकोच्या संघर्षामुळे महिलांवर आणि त्यांच्या मुलांवर होणाऱ्या परिणामांचे त्यांनी जवळून निरीक्षण केले. या विषयावर समाजात अधिक जनजागृती व्हावी, महिलांना न्याय मिळावा आणि सकारात्मक बदल घडावा यासाठी त्यांनी ‘हुंदका’ या कवितासंग्रहाच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार मांडले.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page