बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेल्या केस गळतीच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. या केसगळतीच्या मागचं नेमकं कारण पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी शोधून काढलं आहे. डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी या भागातील रुग्णांवर संशोधन करून हे केसगळतीचं कारण शोधून काढलं आहे. हिम्मतराव बावस्कर यांनी याआधी विंचूदंशावरील औषध शोधून काढलं होतं. दरम्यान, आता बुलढाण्यातील केसगळती या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या टीमने त्यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत ते काय म्हणाले, ते जाणून घेऊयात.