• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत पाच महिन्यांची मिळाली मुदतवाढ; देवेंद्र फडणवीसांची घोषणा नेमकी काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 7, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत पाच महिन्यांची मिळाली मुदतवाढ;  देवेंद्र फडणवीसांची घोषणा नेमकी काय?

मुंबई, 7 मार्च : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाषण केले. दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत पाच महिन्यांची मुदतवाढ देत असल्याची घोषणा केली. तसेच यापुढे आता या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ मिळणार नाही, त्यांच्या जागी नवीन मुलं प्रशिक्षणासाठी घेतले जातील, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांची घोषणा नेमकी काय? –
विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना पुढील पाच महिन्यांची मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच पुढील 11 महिन्यांचा कालावधी त्यांचा पुर्ण करण्यात येणार आहे.

दरम्यान, 11 महिन्यानंतर त्याच प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा घ्या, अशी विनंती लोकप्रतिनिधींनी करू नये. कारण, ही कार्य प्रशिक्षण योजना आहे. ही नोकरीची योजना नाही. या योजनेच्या माध्यमातून त्यांच्याकडे सरकारचे प्रमाणपत्र असेल तर त्यांना नोकरीत लाभ होईल. यामुळे 11 महिन्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून नवीन भरती केली जाणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नेमकी काय? –
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात युवकांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली. या योजनेनुसार 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार, आयटीआय आणि पदविकाधारक विद्यार्थ्यांना 8 हजार तर पदवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अप्रेंटिस तत्वावर भरती करून घेत प्रशिक्षण दिले जाते. दरम्यान, आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी मुदतवाढीची मागणी केली जात होती. यामुळे पाच महिन्यांची मुदतवाढ देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा : लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार का?, मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्ठच सांगितलं, नेमकं काय म्हणाल्या?

    बातमी शेअर करा !
    Share
    Tags: cm devendra fadnavismukhyamantri yuva karyaprashikshan yojanasuvarna khandesh livevidhansabha

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

    माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

    August 30, 2026
    नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

    नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

    August 30, 2026
    ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

    ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

    August 29, 2026
    विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    August 29, 2026
    ‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

    ‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

    August 29, 2026
    ‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

    ‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

    August 29, 2026
    • About
    • Contact Us
    • TERM AND CONDITIONS
    © 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    No Result
    View All Result
    • Home
    • जळगाव जिल्हा
      • जळगाव शहर
      • पाचोरा
      • धरणगाव
      • एरंडोल
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • जामनेर
      • पारोळा
      • बोदवड
      • भडगाव
      • भुसावळ
      • यावल
      • रावेर
      • मुक्ताईनगर
    • महाराष्ट्र
    • खान्देश
      • धुळे
      • नंदुरबार
    • देश-विदेश
    • क्राईम
    • व्हिडीओ
    • साहित्य-परंपरा
    • मनोरंजन
    • करिअर
    • WEB STORIES

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    Share

    You cannot copy content of this page