छत्रपती संभाजीनगर, 16 मार्च : काँग्रेसचे जेष्ठ नेते नाना नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे-अजित पवार यांना होळीनिमित्त शुभेच्छा देत मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. दरम्यान, आता शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी नाना पटोलेंच्या ऑफरला खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. (sanjay shirsat on nana patole)
मंत्री संजय शिरसाट काय म्हणाले? –
छत्रपती संभाजीनगरात आज माध्यमांसोबत संवाद साधताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, दहा आमदारांचा पक्ष तो आम्हाला ऑफर देतोय. खरंतर, यांना झालंय काय हेच नेमकं कळत नाहीये. होळीचा रंग आणि चढलेली उतरली की नाही हाच प्रश्न आहे. दहा आमदार तुमचे आणि आमचे 60 आमदार तरी आम्ही तुमच्याकडे यावं?
View this post on Instagram
दरम्यान, काँग्रेसला स्वतःचे बुड कुठे ठेवण्यासाठी जागा मिळत नाहीये. निस्तानाबुत झालेल्या काँग्रसेने आम्हाला शहाणपण शिकवू नये. शिवसेना-भाजपची पक्की युती आहे आणि हे राज्य आम्ही चांगल्याप्रकारे चालवून दाखवू, असेही मंत्री शिरसाट (sanjay shirsat) म्हणाले आहेत.
नाना पटोलेंची ऑफर नेमकी काय होती? –
एकनाथ शिंदे आधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. यामुळे त्यांची नव्या सरकारचे नेतृत्व करण्याची इच्छा होती. यासोबतच अजित पवारांना देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. मात्र, भाजप तसे होऊ देणार नाही. म्हणून त्या दोघांनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देऊ, असे नाना पटोले होळीच्या शुभेच्छा देताना म्हणाले होते. दरम्यान, काल या वक्तव्यावरून युटर्न घेत बुरा नं मानो होली है.. असं म्हणून त्या विषयाला मी गंमतीने घेतले असल्याचे नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा : Dhule Crime : पती-पत्नीमधील वाद टोकाला, पोलीस पत्नीची आत्महत्या, धुळे जिल्ह्यातील धक्कादायक घटना